Pali News : ‘वानरमारें’ना हवी वीजजोडणी; बेतोडा-निरंकाल येथे वास्तव्य

Pali News : केतन भाटीकर यांच्याकडून मुलांना वह्यांचे वाटप
Pali
Pali Dainik Gomantak

Pali News :

पाळी, बेतोडा-निरंकाल येथील वानरमारे समाजाला दिलेले सोलरवरील विजेचे साहित्य खराब झाल्याने सध्या असह्य उकाडा जाणवत आहे. तसेच रात्रीच्यावेळी गैरसोय होत असल्याने आम्हाला वीजजोडणी द्यावी, अशी मागणी येथील वानरमारे समाजाने केली.

सुमारे पंचवीस कुटुंबीय या ठिकाणी वास्तव्यास असून काबाडकष्ट करून ते आपले पोट भरतात. या समाजातील मुलांना रायझिंग फोंडाचे डॉ. केतन भाटीकर यांनी वह्यांचे वाटप केले. त्यावेळी या समाजातील लोकांनी त्यांच्याकडे वीजजोडणीची मागणी केली. यावेळी डॉ. केतन भाटीकर तसेच रायझिंग फोंडाचे इतर पदाधिकारी व एका स्वयंसेवी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

वानरमारे समाजातील लोकांना खरे म्हणजे मदतीचा हात देणे आवश्‍यक आहे. कष्ट करून जीवन जगणाऱ्या या लोकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आपण मुख्यमंत्री तसेच मगो पक्षाच्या नेत्यांकडे बोलणार आहे. येथील मुलांना शिक्षणासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करू. या समाजातील मुलांचे ज्ञान इतरांप्रमाणेच असून त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज आहे.

- केतन भाटीकर

आम्हा वानरमारे कुटुंबांना सरकारकडून सहकार्य केले जात असले तरी स्वयंसेवी संस्था संघटनांचा मोठा आधार आहे. मागच्या वेळेला आम्हाला सोलरवर चालणारे विजेचे साहित्य देण्यात आले होते; पण ते साहित्य खराब झाल्याने विजेवरील सर्वच वस्तू चालेनाशा झाल्या आहेत. आम्हाला वीजजोडणी दिली तर आमची समस्या दूर होऊ शकते. निदान आमच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी विजेची सोय अत्यावश्‍यक असून त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत. - गोपाळ पवार, वानरमारे समाज

Pali
Goa Statehood Day: प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि CM सावंत यांनी दिल्या घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

मुलांना शिक्षणाची आवड

१ रानावनात शिकार करून पोट भरणाऱ्या वानरमारे समाजातील मुले शिकायला लागली आहेत. समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या वानरमारे समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी अनेक संस्था, संघटना प्रयत्नशील आहेत.

२ वानरमारे ज्या ठिकाणी राहतात, ती जागा वन खात्याच्या अंतर्गत येत असल्याने सुविधांच्याबाबतीत मर्यादा येतात. सध्या या कुटुंबातील मुले नववीपर्यंत शिक्षण घेत आहेत. नजीकच्या शाळा, विद्यालयांत ही मुले शिकत असून त्यांना शिक्षणाची आवड असल्याचे निदर्शनास आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com