Valpoi News : कामगार कायद्यांतूनच कामगारांचे भविष्य सुरक्षित : ॲड. यशवंत गावस

Valpoi News : वाळपईत कामगार दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन
Valpoi
Valpoi Dainik Gomatnak

Valpoi News :

वाळपई , कामगारांचे वर्तमान व भविष्य हे बऱ्याच अंशी कामगार कायद्यांमुळे सुखमय झाले आहे. समान वेतन कायदा, किमान वेतन कायदा, यासारखे विविध कायदेही कामगारांचे हितसंबंध जपणारे आहेत, असे प्रतिपादन ॲड. यशवंत गावस यांनी केले.

देशातील इतर भागांचा विचार करता व गोव्यात कामगार व त्यांचे मालक वर्ग यांच्यामध्ये नेहमीच सौहार्दपूर्ण वातावरण राहिले आहे. आणि त्यामुळेच गोव्यात संपासारख्या गोष्टी अगदी विरळच घडत असतात, असेही गावस यांनी म्हणाले.

वाळपई येथे श्रध्दा लोणचे उद्योग आस्थापनात आयोजित कामगार दिनानिमित्त कामगार कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात गावस बोलत होते.

Valpoi
Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

वाळपई कायदा सल्लागार समिती व वाळपई न्यायालय यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यायाधीश वासीम रिझवी, प्रितम कुडाळकर, मीनल तळावणेकर, सागर सावंत, वाळपई श्रद्धा आस्थापनाचे मालक लक्ष्मण जोशी उपस्थत होते. प्रितम कुडाळकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com