Valpoi Old Bridge : सावर्डे जुना पूल होणार कालबाह्य : विश्वजीत राणे

Old Bridge : जुलैमध्ये सुसज्ज पुलाची पायाभरणी; वाहनांची संख्या दिवसेंदिवस प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यात सावर्डे येथे सुसज्ज पुलाची पायाभरणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनी सांगितले.
Valpoi Old Bridge
Valpoi Old BridgeDainik Gomatnak

Valpoi Old Bridge :

वाळपई, सावर्डे पंचायत क्षेत्रात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता. त्यावेळची ती गरज होती. आज गावाचे रूपांतर शहरी भागात होत असल्याने वाहतूक वाढली आहे.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यात सावर्डे येथे सुसज्ज पुलाची पायाभरणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनी सांगितले. ते सावर्डे येथे आयोजित भाजपच्या जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, मंडळाचे अध्यक्ष रामदास डांगी, भाजपचे प्रभारी विनोद शिंदे, सावर्डे पंचायतीचे सरपंच उज्ज्वला गावकर, पंच सभासद नितेंद्र बाळासाहब राणे, शिवा कुडसेकर, शिवाजी माणिकराव देसाई, बुधाजी विठोबा म्हाळशेकर, अक्षता गुरुदास गावकर व यशोदा सत्यवान गावडे यांची उपस्थिती होती.

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक म्हणाले, की २५ वर्षांमध्ये उत्तर गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बाराशे प्रकल्प पूर्ण करून विकासाला आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सत्तरी तालुक्यातील जनतेने आपल्याला सातत्याने सहकार्य केलेले आहे. या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदान करा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

Valpoi Old Bridge
Goa Drug Case: तळघरात गांजाची लागवड; बोरीत तरुणाला अटक, 8.50 लाखांचे अमली पदार्थ जप्त

दरम्यान, सावर्डेच्या सरपंच उज्ज्वला गावकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यांनी सावर्डे पंचायत क्षेत्रामध्ये आतापर्यंत राबवण्यात आलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा उल्लेख करून येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन दिले. सावर्डे या ठिकाणी नवीन पुलाची सुविधा उपलब्ध करण्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी आश्वासन दिल्याबद्दल गावकर यांनी सावर्डे पंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com