Valpoi News : वैश्य समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक

Valpoi News : स्वामींचे वाळपईत समाजातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. शेळप येथील ढोल ताशाच्या गजरात स्वामींचे खास स्वागत झाले.
Valpoi
ValpoiDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News :

वाळपई, वैश्य समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून हा एक व्यावसायिक समाज आहे. त्यामुळे उद्योजक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करून आपल्या समाजाची प्रगती साधावी.

तसेच हा समाज पुढे जाण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन वैश्य समाजाचे महागुरु तथा हळदीपूर मठाचे मठाधीश प. पू श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी यांनी केले.

वाळपई येथील हनुमान मंदिरात वैश्य समाजबांधवांना त्यांनी मार्गदर्शन केले. स्वामीजी पुढे म्हणाले की, वैश्य समाजाचे पूर्वज ४०० वर्षा पूर्वी काशी तेथे होते. मुगल राजवटीत वैश्यांची घरे तसेच मठ नष्ट करण्यात आले. त्यानंतर समाजबांधव कर्नाटक येथील हळदीपुर येथे स्थायिक झाले. हळू हळू या समाजाचा विस्तार होऊ लागला. आज देशभर समाजाचे लोक आहेत, असे ते म्हणाले.

Valpoi
Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

स्वामीजी पुढे म्हणाले, वैश्य समाजाने नेहमीच सामाजिक भान राखले आहे. वृत्ती, कर्तृत्व, दातृत्व म्हणजे वैश्य समाज होय. वाळपईत वैश्य समाज चांगले कार्य करत आहे, असे ते म्हणाले.

स्वामींचे वाळपईत समाजातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. शेळप येथील ढोल ताशाच्या गजरात स्वामींचे खास स्वागत झाले. यावेळी सर्वांनी स्वामींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. स्वामींजीनी हनुमान मंदिरात पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येने वैश्य समाजबांधवांची उपस्थिती होती.

सूत्रसंचालन अखिल गोवा वैश्य समाजाचे अध्यक्ष सुमीत वार्णेकर यांनी केले. यावेळी वैश्य समाजाचे भानुदास वेलिंगकर, कालिदास मणेरकर आदी उपस्थित होत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com