Valpoi News : जीर्ण वास्तुमुळे मजुरांचा जीव धोक्यात; पोर्तुगीजकालीन धोकादायक इमारत खाली करा

Valpoi News : छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानाच्या बांधकामात हे मजूर काम करत आहेत. ही इमारत अत्यंत धोकादायक असून कधीही कोसळू शकते.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई येथील अवरलेडी चर्चसमोर असलेल्या पोर्तुगीजकालीन मुनिसिपीओ पोलिस क्वाटर्सची अवस्था दयनीय झाली आहे. या इमारतीची वेळेवर डागडुजी करण्यात आली नसल्याने ही इमारत कोणत्याही क्षण कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यात या जुन्या इमारतीमध्ये सध्या परप्रांतीय मजूर वास्तव्य करीत आहेत.

शेजारी चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानाच्या बांधकामात हे मजूर काम करत आहेत. ही इमारत अत्यंत धोकादायक असून कधीही कोसळू शकते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याआधी या मजुरांना इमारतीतून हटवावे, अशी सूचना स्थानिक रहिवाशांनी प्रशासकीय यंत्रणेला केली आहे.

जुनी इमारती धोकादायक बनल्याने दहा वर्षांपूर्वीच पोलिस कर्मचाऱ्यांचे स्थलांतरण करण्यात आले होते. त्यामुळे दहा वर्षांपासून ही इमारत विनावापर आहे. इमारतीचा काही भाग आधीच कोसळलेला आहे. इमारतीच्या भिंती अत्यंत कमकुवत झालेल्या आहेत. छप्पर कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे, असे असतानाही उद्यानाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने परप्रांतीय मजुरांची व्यवस्था या इमारतीत केलेली आहे.

Valpoi
BPCL Cylinder Shortage In Ponda: फोंड्यात ‘बीपीसीएल’ सिलिंडरचा तुटवडा, पाच दिवस सेवा ठप्प

हे परप्रांतीय कामगार सहकुटुंब या इमारतीत राहत आहेत. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यासोबत लहान मुलेही आहेत. याकडे स्थानिक पोलिस व मामलेदार कार्यालय व पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सदर इमारत ही पोर्तुगीज काळापासून अस्तित्वात असून या इमारतीचा ताबा गृह खात्याकडे आहे. या इमारतीत पूर्वी पोलिस कर्मचारी रहायचे. गोवा स्वतंत्र झाल्यापासून पोलिस कर्मचाऱ्यांनी या क्वाटर्समध्ये आपला संसार थाटला होता. पूर्वीच्या काळात मात्र १५ रुपये भाडे या क्वाटर्ससाठी आकारण्यात येत होते.

एकूण १८ कुटुंबे हा इमारतीत वास्तव्यास होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आपापल्या परिने इमारत दुरुस्ती केली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात जुन्या कर्मचाऱ्यांनी इमारतीवर मालकी हक्क सांगितल्याने प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर ही इमारत जुनी झाल्याने एकेक करून सर्वांनी स्थलांतर केले. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने इमारतीच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले.

...तर जबाबदारी कोण घेणार ?

सध्या या इमारतीची अत्यंत वाईट परिस्थिती असल्याने अनेक वर्षे छताचे व इतर बांधकामाचे दुरुस्ती न केल्याने पहिल्या मजल्यावरील छत कोसळले आहे. आणि कोणत्याही क्षणी ही इमारत जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत असताना या इमारतीत काही परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असल्याने जर ही इमारत कोसळली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे लवकरत लवकर ही इमारत खाली करण्याची गरज आहे.

सदर पोर्तुगीजकालीन इमारत ही जुनी व धोकादायक बनली आहे. वरचा भाग हा हळूहळू कोसळू लागला आहे. त्याच स्थितीत या ठिकाणी काही मजूर रहात आहेत. आम्ही त्यांना रोज पहात आहोत.

जर ही इमारत कोसळून कोणाचे बरे वाईट झाले तर याला कोण जबाबदार राहील. ही जुनी इमारत असल्याने गेले कित्येक वर्षे याठिकाणी कोणीच रहात नव्हते मात्र या मजुरांना रहाण्यासाठी कोणी परवानगी दिली याचे आश्‍चर्य वाटते.

— रामा गावस, वाळपई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com