Goa Politics : सध्याच्या राजकारणाचा स्तर खालावलाय! उत्पल पर्रीकर यांची खंत

मेळाव्यात सारस्वत विद्यार्थ्यांचा गौरव
utpal parrikar slams Goa Politics
utpal parrikar slams Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics : जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जावे लागते, तेव्हा आयोजक माझी राजकारणी म्हणून ओळख करून देतात.

पण सध्याच्या राजकारणाचा स्तर आणि दर्जा खालावलेला असल्याने स्वत:ला राजकारण्यांच्या पंक्तींत बसवावे की नाही, हा मोठा प्रश्र्न आपल्यासमोर असल्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी मडगावातील एका कार्यक्रमात सांगितले.

utpal parrikar slams Goa Politics
Fire In Goa: तोरसे- पेडणे येथे काजूबागेला आग, 10 एकरातील काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी

सारस्वत समाजाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय अन्न व सांस्कृतिक मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रत्येक समाज आणि त्याचे वैशिष्ट्य हे महत्त्वाचे आहे. गोव्यात पारतंत्र्यात असताना आणि पारतंत्र्यानंतरही प्रत्येक समाजाने आपली संस्कृती जपली, ही चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

सारस्वत हे सरस्वती म्हणजेच ज्ञान व विद्येचे उपासक, म्हणून त्यांना ‘सारस्वत’ असे म्हणतात. परंतु आमचे पूर्वज सरस्वती नदीकाठी राहात म्हणून त्यांना सारस्वत म्हटले गेले की, आम्ही सरस्वतीचे उपासक म्हणून त्या नदीला सरस्वतीचे नाव पडले, यावर अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ज्यांचा गौरव होत आहे, त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा पुष्कळ शिकावे व मातृभूमीच्या उन्नतीसाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. या सोहळ्यात सारस्वत समाजातील सुमारे 400 गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्पल पर्रीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com