Fire In Goa: तोरसे- पेडणे येथे काजूबागेला आग, 10 एकरातील काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी

बागायतदारांचे अंदाजे 9-10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा स्थानिकांचा दावा
Fire In Goa
Fire In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fire In Goa: सध्या गोव्यात आंबा काजू सिझन सुरु झालाय. त्यातच वातावरण बदलही होऊ लागलाय. उन्हाची तीव्रता देखील हळूहळू वाढू लागलीय. अशा परिस्थितीत जंगल क्षेत्रातील, बागायतीमधील गवताला, पालापाचोळ्यांना आगी लागण्याचे प्रमाणही वाढत आहे.

रविवारी दुपारच्या सत्रात तोरसे- पेडणे येथील एका काजू बागेला आग लागण्याचा प्रकार घडला. सदरच्या आगीत सुमारे 10 एकरवरील काजू कलमे जळून खाक झाल्याचे वृत्त हाती आलेय.

काही दिवसांपूर्वी डिचोलीतील म्हावळीगे येथील काजू बागेला आग लागून मोठी हानी झाली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र वाऱ्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केल्याने म्हावळीगे डोंगरावरील आगीत शेकडो काजूची कलमे जळून खाक झाली होती.

तोरसे- पेडणे येथील आगीत सुद्धा मोठ्या प्रमाणात काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. या आगीत सदर बागायतदारांचे अंदाजे 9-10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com