पणजी: शुक्रवारी (दि.20 सप्टेंबर) मांडवी पुलावर झालेल्या अपघातात पोलिसांनी काल रोशन शहा नावाच्या नेपाळ मधील 22 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या नवीन माहितीनुसार हा तरुण अपघाताच्यावेळी नशेत होता, तसेच त्याच्याजवळ गाडी चालवण्याचे लायसन्स देखील नाही.
या गाडीचा मालक आदर्श बाबुसो कळंगुटकर याला देखील बेकायदेशीर प्रकारे स्वतःची खासगी गाडी रेंटवर दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श कळंगुटकर याने कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि लायसन्स नाही हे माहिती असताना देखील रोशनला गाडी चालवण्याची परवानगी दिली होती.
शुक्रवारी मांडावी पुलावरून पणजीतून म्हापश्याला जाणाऱ्या या कारने ओव्हरटेक करताना पुढून येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली होती. दुचाकीवरील तिघेजण दरम्यान जखमी झाले आणि प्रत्यक्षदर्शींकडून रोशन शहा दारूच्या नशेत असल्याचा दावा केला जात होता.
काल (दि. 21 सप्टेंबर) गोवा पोलिसांकडून रोशन शहा आणि आदर्श कळंगुटकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.