चिंता वाढली! गोव्यात दिवसाला सापडतायेत कॅन्सरचे 4 रुग्ण; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Goa: राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.
चिंता वाढली! गोव्यात दिवसाला सापडतायेत कॅन्सरचे 4 रुग्ण; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट
CancerDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. 2019 ते 2023 दरम्यान राज्यात कर्करोगाचे महिन्याला सरासरी 139 म्हणजेच दिवसाला सरासरी 4.54 रुग्ण आढळले आहेत. राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली. खासदार मदन राठोड यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्न विचारला होता.

दरम्यान, 2019 ते 2023 या पाच वर्षात गोव्यात (Goa) कर्करोगाचे 8,296 रुग्ण आढळले. तर दरवर्षी ही रुग्णसंख्या वाढतच गेली. राज्यात 2019 मध्ये कर्करोगाचे 1591 रुग्ण आढळले होते. तर 2020 मध्ये 1618, 20221 मध्ये 1652 रुग्ण आढळले होते. 2022 मध्ये त्यात 48 ने वाढ होऊन 1700 रुग्ण आढळले, तर 2023 मध्ये सर्वाधिक 1735 रुग्ण आढळले होते.

चिंता वाढली! गोव्यात दिवसाला सापडतायेत कॅन्सरचे 4 रुग्ण; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट
Goa Crime News : अखेर फरार योगेश शेटकर विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस ; पोलिसांना झुकांडी

दुसरीकडे, 2019 ते 2023 या काळात देशात 7135440 रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ दरम्यान महिन्याला सरासरी 1 18924 तर दिवसाला 3837 रुग्ण आढळले. उत्तर प्रदेशात सर्वाधिक वर्षाला सरासरी 2 लाख रुग्ण आढळले. त्यानंतर महाराष्ट्रात वर्षाला सरासरी 1.1 लाख तर, पश्चिम बंगालमध्ये वर्षाला सरासरी 1 लाख रुग्ण आढळले होते. कर्करोगाचे (Cancer) निदान करण्याची अत्याधुनिक साधने व उपचारपद्धती उपलब्ध असल्या तरी वाढलेले आयुर्मान, आरोग्याविषयीची जागरूकता आदी कारणांमुळे कर्करुग्णांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com