Goa News : बोधगयेखाली आहे ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा; उपग्रह छायाचित्रे अन् भू सर्वेक्षणातून माहिती उघड

Goa News : चीनमधील बौद्ध धर्माच्या विकासावर त्यांच्या लिखाणाचा मोठा प्रभाव आहे. ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहम यांना युआन त्संग यांच्या लिखाणाच्या आधारेच ऐतिहासिक नालंदा आणि वैशाली ही स्थळे शोधता आली होती.
Goa News
Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

पाटणा, बिहारमधील जगप्रसिद्ध महाबोधी मंदिराचा परिसर आणि बोधगयेच्या परिसरातील जमिनीखाली वास्तूचा मोठा ऐतिहासिक ठेवा दडलेला असल्याचे उपग्रह छायाचित्रे आणि भू सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या कला, संस्कृती आणि युवक कल्याण विभागाच्या ‘बिहार हेरिटेज सोसायटी’ने (बीएचडीएस) ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठाच्या सहकार्याने येथे संशोधन केले होते.

महाबोधी मंदिर परिसराचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश होतो. भगवान बुद्धांना याच ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

या वारसास्थळाच्या खालीच हा ऐतिहासिक, मौल्यवान वास्तू ठेवा असल्याने त्या ठिकाणी आणखी उत्खनन होणे गरजेचे असल्याचे कला, संस्कृती, युवक कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हरजतकौर बाम्हराह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Goa News
B-12 व्हीटॅमिनच्या कमतरतेमुळे या आजाराला जावे लागते सामोरे; जाणून घ्या लक्षणे

हर्षवर्धनाच्या राजवटीमध्ये युआन त्संग हे चिनी बौद्ध भिक्षु भारतामध्ये आले होते. त्यांचा प्रवास कालावधी हा साधारणपणे इसवीसनाचे ६२९ ते ६४५ वे शतक मानल जाते. याच काळामध्ये त्यांनी ६५७ बौद्ध संहिता चीनमध्ये नेल्याचे मानले जाते.

चीनमधील बौद्ध धर्माच्या विकासावर त्यांच्या लिखाणाचा मोठा प्रभाव आहे. ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहम यांना युआन त्संग यांच्या लिखाणाच्या आधारेच ऐतिहासिक नालंदा आणि वैशाली ही स्थळे शोधता आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com