Bison Attack in Goa: केरी आणि सावई येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांवर गव्याने हल्ला करण्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावांमध्ये गवा दिसण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे बाहेर वावरणे कठीण झाले आहे.
याबाबत नागरिकांनी वन विभागाला यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली असून गव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. माहितीनुसार, पहिल्या घटनेमध्ये, केरीतील निशा या आपली बहीण आणि पाळीव श्वानासह आपल्या काजू बागायतीमध्ये अळंबी काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गव्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि आपल्या शिंगाने निशा यांना काही मीटरपर्यंत फटपटत नेले.
यामध्ये त्या जबर जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला एकूण 21 टाके घालण्यात आले आहेत.
दुसऱ्या घटनेत, सवाई वेरे येथे नवरा-बायको स्कूटर वरून जात असताना अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये मागे बसलेल्या शिल्पा या गंभीर जखमी झाल्या आहेत.
गव्यांचे माणसांवर वाढत चाललेले हल्ले आणि त्यांचा मानव वस्तीजवळील वावर यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.