Malim Jetty Murder: 'मालिम खून'प्रकरणी संशयितांकडून कबुली! झारखंडमधील दोघा कामगारांच्या आवळल्या मुसक्या

Mandovi Bridge Murder: बेती येथील मांडवी पुलाखालील शेडच्या ठिकाणी अज्ञात इसमाचा दगडाने डोके ठेचून खून केल्याप्रकरणी झारखंडच्या कृष्णा प्रधान (१८) व भाऊला ऊर्फ भोला ऊर्फ नारायण सिंग (२३) या दोघांना पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे.
Goa Latest Crime News
Goa arrestDainik gomantak
Published on
Updated on

Goa Malim Jetty Mandovi Bridge Murder Two Arrested

पणजी: बेती येथील मांडवी पुलाखालील शेडच्या ठिकाणी अज्ञात इसमाचा दगडाने डोके ठेचून खून केल्याप्रकरणी झारखंडच्या कृष्णा प्रधान (१८) व भाऊला ऊर्फ भोला ऊर्फ नारायण सिंग (२३) या दोघांना पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. मयत इसमाची ओळख अजूनही पटलेली नाही. संशयितांनी खुनाची कबुली दिली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

मयत इसम व संशयितांची भेट ९ नोव्हेंबर रोजी या पुलाखाली शेडच्या ठिकाणी मद्य घेताना झाली. ते तिघेही मद्य घेत असताना त्यांच्यामध्ये भांडण झाले व त्यानंतर एकमेकाला मारहाणीनंतर रागाच्या भरात संशयितांनी त्याच्या डोक्यात चिऱ्याचा दगड घातला. त्यामुळे इसम जागीच ठार झाला. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा २४ तासात लावला.

संशयित हे मालिम जेटी येथील ट्रालर्सवर हंगामी कामाला होते. मासेमारी मोसम सुरू झाल्यानंतर ते तीन महिन्यापूर्वी झारखंड येथून आले होते. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते माहिती देण्याच्या स्थितीत नव्हते. हल्लीच पोलिसांनी सुरू केलेल्या मजुर पडताळणीमुळे त्यांची माहिती मालिम पोलिस चौकीत नोंद होती. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावण्यात त्याची मदत झाली, अशी माहिती पर्वरी पोलिसांनी दिली.

Goa Latest Crime News
Cash For Job: 1 कोटी 20 लाखांची फसवणूक? 'Cash For Job Scam' प्रकरणात ढवळीतील शिक्षकाला अटक

घटनास्थळावरून रिकामी दारूची बाटली, पाण्याची बाटली तसेच प्लॅस्टिकची ग्लासेस जप्त केली आहेत. खून करण्यासाठी वापरण्यात आलेला चिऱ्याचा दगड ताब्यात घेतला आहे. मयत हा जेटीवर कामाला नसल्याचे केलेल्या तपासात उघड झाले आहे. त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मयत व संशयितांनी अतिप्रमाणात मद्यप्राशन केल्याने त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून ही घटना घडल्याचे चौकशीतून पुढे आले आहे असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com