Margao Municipal Council: मडगाव पालिकेच्या वाहनांमुळे नागरिकांना त्रास; वाहने हटवण्याची मागणी

याआधी जुन्या मार्केट जवळील गॅरेजमध्ये या आधी नगरपालिकेची वाहने लावण्यात येत होती
Margao Municipal Council
Margao Municipal CouncilGomantak Digital Team
Published on
Updated on

Margao Municipal Council: शनिवारपासून मडगाव नगरपालिकेची अनेक वाहने रिंगरोडच्या दोन्ही बाजूला उभी करण्यात आल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जुन्या मार्केट जवळील गॅरेजमध्ये या आधी नगरपालिकेची वाहने लावण्यात येत होती; मात्र तिथे असलेल्या फेस्तमुळे पारंपरिक विक्रेत्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून नगरपालिकेची वाहने तिथून हलवून रिंगरोडजवळ लावण्यात आली आहेत.

Margao Municipal Council
Sadetod Nayak : गोंयकारपण हरवण्यास गोमंतकीयच जबाबदार : ‘सडेतोड नायक’

सध्या पालिकेची नेहमीची पार्किंगची जागा विक्रेत्यांना भाड्याने देण्यात आली आहे. पालिकेची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करणे बेकायदेशीर आहे.

पालिकेनेआपली वाहने इतरत्र पार्क करण्याची आवश्यक व्यवस्था करायला हवी होती. पालिकेला नियोजन जमले नसल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

नागरिकांनी रस्त्यावरून अडथळा निर्माण करणारी ही वाहने त्वरित हटवण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी महापालिकेला द्यावेत अशी मागणीही केली आहे.

दरम्यान, महितीनुसार हे फेस्त 8 दिवस चालणार आहे. पालिका आठ दिवस रस्त्यालगत वाहने उभी करणार का? वाहतूक पोलीस परवानगी देणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आपली वाहने उभी करण्यासाठी पालिकेने मोकळ्या जागेचा वापर करावा, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com