Tourist Robbery: पर्यटकांची लूट सुरूच! महाराष्ट्रातील पर्यटकाला लुबडल्याप्रकरणी एकाला अटक

कळंगुट पोलिसांनी योगेंद्र बेहरा (23, ओडिसा) याला अटक केली
Tourist Robbery in Goa
Tourist Robbery in GoaDainik Gomantak

Tourist Robbery in Goa: राज्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची होणारी लूट अद्यापही सुरूच आहे. कळंगुट येथील मेहफील क्लबमध्ये कोल्हापूरच्या एका पर्यटकाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी योगेंद्र बेहरा (23, ओडिसा) याला अटक केली आहे.

Tourist Robbery in Goa
54th IFFI Goa 2023: गोव्यातील 7 चित्रपट इफ्फीच्या अधिकृत विभागात असतील का? अमरनाथ पणजीकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

उपलब्ध माहितीनुसार, योगेंद्र हा क्लबमध्ये कामाला असून त्याने पर्यटकाकडून 16 हजार रुपये लुबाडले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अजून एक जण फरार असून त्याचा पोलीस तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या दोन पर्यटकांना लुटण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होत. त्यावेळी गोवा पोलीस आणि सरकारवर अजिबात विश्वास नसल्याचे परखड मत त्या पर्यटकांनी व्यक्त केले होते.

तसेच पुन्हा गोव्यात कोणालाही येऊ नये असा सल्ला आपण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आणि या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र तरीही हे प्रकार किनारी भागात सुरूच आहेत. यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची प्रतिमा डागाळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारने याबाबत ठोस पावले उचलावीत, असे मत पर्यटक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, राज्याला भेट देणारे पर्यटक आपले सर्वप्रथम पाहुणे आहेत. आपण त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांच्याशी उद्धटपणे वागणे, त्यांना क्षुल्लक कारणांवरून मारबडव करणे आदी प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत,

असा सज्जड दम म्हापशाचे उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी बार्देशातील हणजूण, वागातोरच्या हॉटेल तसेच रिसॉर्टमालकांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com