
Tour Booking For Goa: मान्सूननंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा पर्यटनाला वेग येणार आहे. याबाबत देशात विविध ठिकाणी लोकांनी बुकिंगसाठी चौकशी सुरू केली आहे.
मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये परदेशात जाण्यासाठी होणाऱ्या चौकशीच्या तुलनेत 35 टक्के चौकशी गोव्यासाठी केली जात आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गोवाच खास असल्याचे लोक बोलत आहेत.
मान्सून आता अखेरच्या टप्यात आहे. देश-विदेशातील पर्यटनस्थळांबाबत दररोज ट्रॅव्हल एजंटांकडे चौकशी सुरू आहे. सहसा परदेशात पर्यटनासाठी जाण्याची चौकशी केली जाते. पण, भारतात पूर्वेकडील राज्यांसह राजस्थान आणि गोव्यात सर्वाधिक चौकशी आणि बुकिंग होत आहेत.
ट्रॅव्हल एजंट्सच्या मते, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे पर्यटनासाठी खूप खास असतात. अनेकांनी परदेशी जाण्यासाठी दीड ते दोन महिने अगोदर बुकिंग केले आहे. गोव्याला देशात सर्वाधिक मागणी आहे. डिसेंबर महिना गोव्यासाठी खास असतो. या काळात येथे अधिक गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे लोक दोन ते अडीच महिने आधीच बुकिंग करतात, यात सर्वाधिक ग्रुप बुकिंग आहेत.
मध्य प्रदेश-छत्तीसगड ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीआयई) अध्यक्ष हेमेंद्र सिंग जदौन म्हणाले की,
आगाऊ बुकिंग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विमान तिकीट आणि त्याचा खर्च. येत्या काळात या ठिकाणांचा विमान प्रवास महाग होणार आहे. शहरातील लोकांनी थायलंडसाठी भरपूर बुकिंग केले आहे. दुबई ही नेहमीच इथल्या लोकांची पसंती राहिली आहे.
गोव्याचा हंगाम पुढील महिन्यापासून सुरू होणार असला तरी डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात सर्वाधिक मागणी आहे. अशी माहिती मध्य प्रदेश-छत्तीसगड ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीआयई) अध्यक्ष हेमेंद्र सिंग जदौन यांनी एका हिंदी वृत्त संकेतस्थळाला दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.