Goa Assembly Session: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 19 विधेयके मंजूर, 14 विधेयकांवर राज्यपालांकडुनही मोहोर

18 दिवस कामकाज 33 विधेयकांना मिळाली मंजुरी; सभापती तवडकर
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak

Goa Assembly Session: गोवा राज्‍य विधानसभा पावसाळी अधिवेशनाचे 18 दिवसांचे कामकाज काल गुरुवारी सायंकाळी संपले. या अधिवेशनात 19 विधेयकांना सभागृहाने तर 14 विधेयकांना राज्यपालांनी मंजुरी दिल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.

Goa Assembly Session
Goa Accident: गोव्यात रस्ते अपघातप्रकरणी 251 जणांना शिक्षा तर 350 चालक ठरले निर्दोष... सहा वर्षातील आकडेवारी

प्रारंभी तवडकर यांनी ‘श्रमधाम’ योजनेला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, 18 जुलै 2023 पासून या अधिवेशनास सुरुवात झाली आणि 10 ऑगस्ट रोजी समारोप झाला. या अधिवेशनात 120 तास आणि 44 मिनिटे कामकाज झाले.

930 तारांकित व 1953 अतारांकित अशा एकूण 2 हजार 883 प्रश्नांवर सूचना आल्या. त्यापैकी 930 सूचना स्वीकारल्या. 90 तारांकित प्रश्नांवर तोंडी उत्तरे देण्यात आली. 840 तारांकित आणि 1953 प्रश्नांची उत्तरे सभागृहाच्या पटलावर मांडली.

Goa Assembly Session
Banastarim Bridge Accident: दिवाडी बेट अजूनही धुमसतेच आहे..!

कामकाज सल्लागार समितीचा तिसरा 2023 अहवाल मांडला आणि तो संमत झाला. शिवाय 23 शोक प्रस्ताव आणि 32 अभिनंदनाचे ठराव मंजूर झाले. 320 कागदपत्रे अध्यादेश सभागृहासमोर ठेवल्या.

144 शून्य उल्लेख, ३६ लक्षवेधी सूचना सभागृहासमोर चर्चेत आल्या. 18 रोजी 2023-24 च्‍या अर्थसंकल्पावर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिले. 2023-24 अनुदानित मागण्या व त्यावरील कपात सूचना मांडल्या. त्या सभागृहासमोर मतदानासाठी आणून नाकारल्या. तर अनुदानित मागण्या मंजूर करण्यात आल्या.

Goa Assembly Session
Goa Medical College: वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणविरोधी याचिकेवर आज खंडपीठाचा निर्णय

गोवा विनियोग विधेयक-2023 मांडण्यात आले आणि त्यावर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले.

65 विद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षकांनी लावली उपस्‍थिती

अधिवेशनाच्या काळात राज्यभरातून 65 विद्यालयांच्‍या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 3 हजार 869 विद्यार्थी, 2 हजार 285 शिक्षक तसेच अन्‍य कर्मचाऱ्यांनी कामकाजाचा अनुभव घेतला.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सभागृहाचे नेते तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह सर्वांचे सहकार्य केल्याबद्दल सभापती रमेश तवडकर यांनी त्‍यांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com