Goa News: "चेंगराचेंगरीची सरकारने जबाबदारी घ्यावी" माणिकराव ठाकरे; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Today's Marathi News: जाणून घ्या गोव्यातील प्रमुख घडामोडी
Congress leader Manikrao Thackeray
Congress leader Manikrao ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

"चेंगराचेंगरीची सरकारने जबाबदारी घ्यावी" माणिकराव ठाकरे

शिरगाव जत्रा चेंगराचेंगरीची सरकारने जबाबदारी घ्यावी, धोंड्यांना दोष देणे हा उपाय नाही, आम्ही न्यायालयीन चौकशीची मागणी करतो : एआयसीसी प्रभारी माणिकराव ठाकरे

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांची बदली

शिरगाव चेंगराचेंगरी घटनेच्या निष्पक्ष चौकशीसाठी सरकार उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, उत्तर पोलिस अधीक्षक अक्षत कौशल आणि डिचोली पोलिस ठाण्याचे डीवायएसपी, पीआय यांची बदली करणार आहे. विशेष तथ्य शोध समिती उद्यापर्यंत अहवाल देईल: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

"संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेईन" डॉ. प्रमोद सावंत

शिरगाव जत्रेतील घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी दंडाधिकारी चौकशी सुरू करतील. मी लवकरच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि योग्य कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेईन. डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

लईराई जत्रोत्‍सवाला गालबोट; आठ भाविक अत्‍यवस्थ

प्रशासन व देवस्‍थान समितीला दोष नको: दीनानाथ गावकर

या घटनेनंतर लईराई देवस्‍थानचे अध्‍यक्ष दीनानाथ गावकर म्‍हणाले, झालेली घटना अत्‍यंत दुर्दैवी आहे. त्‍याचा आम्‍हाला खेद आहे. काही धोंडगण व भाविकांच्‍या बेजबाबदारपणामुळे हा दुःखद प्रसंग ओढवला. प्रशासन व देवस्‍थान समितीला दोष देणे चुकीचे ठरेल. पुढे कौल - प्रसाद आहे. तेव्‍हा भाविकांनी गर्दी टाळावी. पाचव्‍या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही दक्षता बाळगावी.

उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, गोवा भाजप अध्यक्ष दामू नाईक शिरगावात

शिरगाव जत्रा चेंगराचेंगरी; उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, गोवा भाजप अध्यक्ष दामू नाईक आणि आमदार प्रेमेंद्र शेट घटनास्थळी

लईराई जत्रेच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत म्हाळशी कुर्टी येथील तिघेजण जखमी

शिरगांव येथे लईराई जत्रेच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत म्हाळशी कुर्टी येथील तिघेजण जखमी. जखमीना उपजिल्हा इस्पितळात उपचार. कृषी मंत्री रवी नाईक इस्पीतळात दाखल.

लईराई मंदिरातील चेंगराचेंगरीचा व्हिडिओ समोर

लईराई जत्रेतील चेंगराचेंगरीमुळे राज्य सरकारकडून पुढील तीन दिवसांतील सर्व कार्यक्रम रद्द

लईराई जत्रेतील चेंगराचेंगरीमुळे राज्य सरकारने पुढील तीन दिवसांतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. शिरगावच्या जत्रेतील चेंगराचेंगरीत 40 ते 50 भाविक जखमी; सहा भाविकांचा मृत्यू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com