
केपे येथील एका मुलीवर आरोपींनी चाकूने वार केले. मुलीला सध्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत आहे, पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की आरोपीची ओळख पटली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
मोले अभयारण्य क्षेत्रातील वळडंव येथे भले मोठे सागवानी झाड कापून १३ तुकडे चोरुन नेण्याच्या प्रयत्नात असताना वन खात्याचे आरएफओ अनील फर्नांडीस व इतर कर्मचारी यांनी रघु नाईक (वय २६, कुंकळ्ळी) व दिलीप तलवार (वय ४२, किर्लपाल भगवती) याना रंगेहात पकडले. तपास चालू.
'अष्टगंध' च्या संचालकांना अटक करा. सुमारे 11.28 कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची मागणी. संचालकांची मालमत्ता जप्त करा. सरकारकडे मागणी.
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना मडगाव येथील वीज विभागाच्या मालमत्तेवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले.
गोव्यात ठीक-ठीकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पेडण्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली.
खाजगी, कोमुनिदाद आणि आल्वारा जमिनीतील घरे कायदेशीर करण्यासाठी लवकरच कायदा आणणार. आम्हाला कोणाचाही घरे मोडायची अजिबात इच्छा नाही. कोर्टाच्या आदेशामुळे घरांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कला अकादमीचे ओपन एअर ऑडिटॉरीयम 17 जुलै 2023 रोजी कोसळले होते. त्यानंतर सावंत सरकारने वेगवेगळ्या संस्थाकडून याबाबतचा अहवाल मागितला होता. अजूनही कोसळलेल्या ओपन एअर ऑडिटॉरीयमची दुरुस्ती झालेली नाही वा त्यासाठीची कागदोपत्री प्रक्रियाही सुरु झालेली नाही. मात्र या ठिकाणी आता कपडे वाळवण्यात येत आहेत. मुख्य रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनी हे दृष्य पाहून खंत व्यक्त केली आहे.
आंबे-धुल्लई येथील सुनील खानोलकर यांच्या बागायतीत गेल्या 4 दिवसांपासून 5 गवे ठाण मांडून बसले आहेत. वन खात्याकडून गव्यांना हाकलून लावण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन सुरु.
राय पंचायतीच्या उपसरपंच गॉडफ्रे ऑस्वाल्ड सुझा यांच्यासह सहा पंचाविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला.
डिचोलीत 600 आसनव्यवस्थेचे कलाभवन. प्रशासकीय ब्लॉक प्रकल्पाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी. 80 कोटींचा प्रकल्प.
थीवी पंचायत प्रभाग 1 पोटनिवडणुकीत निरज नागवेकर 110 मतांनी विजयी झाले. तर असनोरा पंचायत प्रभाग 7 च्या पोटनिवडणुकीत मीता नाईक 79 मतांनी विजयी झाल्या. रविवारी (11 मे) निवडणूक झाली होती.
गोवा मनोरंजन संस्थेची गेल्या वर्षीचीच टीम यंदाही फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त आपली हजेरी लावायला पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
मडगाव येथे रविवारी (11मे) पोलिसांनी छापेमारी करुन 3.8 किलो गांजासह दोघांना अटक केली. बाजारभावानुसार जप्त केलेल्या गांजाची किंमत 3.8 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.