

हणजूण पोलिसांनी असागाव येथील एका रेस्टॉरंटचे जनरल मॅनेजर गुलशन कुमार सिंग (३२) यांना सुकून हॉस्पिटॅलिटीकडून ४.३७ कोटी रुपयांची फसवणूक आणि गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. फरार असलेल्या सिंगला नवी दिल्लीत पीएसआय स्वप्नील नाईक आणि त्यांच्या टीमने शोधून काढले. ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान बिलांमध्ये फेरफार केल्याचा आणि विक्रेत्यांच्या पेमेंटसाठी असलेल्या निधीचा हिशेब न देण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना ९ मे रोजी अटक करण्यात आली आणि त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावण्याची विनंती केली आहे. त्यांच्या पत्रात गांधींनी अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकत्रित मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
साखळी मतदारसंघातील हरवळे, साखळी व सुर्ल येथे भाजपतर्फे गरजूंना उभारण्यात येणाऱ्या घरांचे भुमीपूजन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या एक ते दिड महिन्यात हि घरे पूर्ण होणार आहेत. भाजप मंडळ समितीतर्फे अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या व धोकादायक स्थितीत घरे असलेल्या लोकांना हि घरे उभारून दिली जात असून या कामात प्रत्येकाने आपले योगदान द्यावे. आपण चांगल्या घरात राहत असताना इतरांनाही रहायल चांगले ईर मिळावे हि भावना ठेऊन सर्वांनी अशा लोकांना मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या ताणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे.
लईराई देवस्थान समितीने धोंड्यांना ओळखपत्र आणि फोटो सादर करण्याचे आवाहन केले आहे. श्रीदेवी लईराईच्या धोंड्यांना विनंती आहे की त्यांनी नोंदणीसाठी शक्य तितक्या लवकर त्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ओळखपत्र मंदिर समितीकडे सादर करावे. देवस्थान समितीने सूचना जारी केली आहे.
कासावर्णे या ठिकाणी रात्री दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात
कासावर्णे या ठिकाणी रात्री दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात होऊन सुहास नारुलकर या युवक जागीच ठार झाला,चारचाकी वाहन चुकीच्या मार्गाने आल्यामुळे दुचाकीला जबरदस्त ठोकर दिल्यामुळे सुहास गंभीर जखमी झाला तो जागीच ठार झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.