Goa News: 'गोव्यातील 6 तालुक्यांमध्ये होती शिवशाही' या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला एड.भेंब्रेंचा आक्षेप; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

News Goa: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी. गुन्हे, राजकारण, क्रीडा मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News: 'गोव्यातील 6 तालुक्यांमध्ये होती शिवशाही' या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला एड.भेंब्रेंचा आक्षेप; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

Goa News: 'गोव्यातील 6 तालुक्यांमध्ये होती शिवशाही' ह्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला एड.भेंब्रेंचा आक्षेप

गोव्यातील जुन्या काबिजाती म्हणजे सत्तरी, पेडणे, फोंडा, सांगे, केपे, काणकोण ह्या तालुक्यांमध्ये शिवाजी महाराजांची शिवशाही अस्तित्वात होती ह्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला एड.उदय भेंब्रेचा आक्षेप. वरील पूर्ण मुलाखत जागोर शिर्षकाखाली एड.उदय भेंब्रे युट्यूब चॅनलवर उपलब्ध.

Kala Academy Goa: 49 वे राज्य कला प्रदर्शन; कला अकादमीने प्रदर्शनासाठी मागवल्या प्रवेशिका

कला अकादमीचे विद्यार्थी वर्गातील ४९ वे राज्य कला प्रदर्शन १३ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत कला अकादमी, पणजी-गोवा येथे आयोजित करण्यात आले आहे. ३ मार्च २०२५ पासून कला अकादमीच्या कार्यालयात आणि कला अकादमीच्या वेबसाइट kalaacademygoa.co.in वर नियमांसह प्रवेश अर्ज उपलब्ध असतील.

Goa Travel: मुंबई आणि गोवा प्रवासाला लवकरच मिळणार मोठा अपग्रेड

मुंबई आणि मांडवा येथील रो-रो (रोल-ऑन, रोल-ऑफ) सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या M2M फेरीच्या जागी मुंबई-गोवा RoPAX फेरी सेवा सुरू करण्याच्या तयार सुरु आहे. ही नवीन फेरी प्रवासी आणि वाहने दोन्ही वाहून नेईल.

बीच पिकनिक थांबवा, त्याऐवजी शैक्षणिक संस्थांच्या भेटींवर लक्ष केंद्रित करा : मुख्यमंत्री

समुद्रकिनारी सहली थांबवल्या पाहिजेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, ओल्ड गोव्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर, वास्कोमधील पोलर इन्स्टिट्यूट, डोना पावला येथील वॉटर इन्स्टिट्यूट आणि आयुष इन्स्टिट्यूट यासारख्या संस्थांना भेटी दिल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Mapusa Municipality: म्हापसा पालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रिया मिशाळ यांचा एकमेव अर्ज

म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका प्रिया मिशाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर. मिशाळ यांचा एकमेव अर्ज दाखल. उद्या शुक्रवारी सकाळी होणार निवडणूक.

Mayem News: मये पंचायतीच्या जुन्या इमारतीचे होणार संवर्धन

दीनदयाळ निधीतून 50 लाख रुपये खर्च करून मये पंचायतीच्या इमारतीचे होणार नुतनीकरण. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते कामाची पायाभरणी.

Goa News: वडभाग उसगांव येथे पाण्याची टंचाई असल्याने नागरीक हैराण

वडभाग उसगांव येथे पाण्याची टंचाई असल्याने नागरीक हैराण.पिण्यासाठी पाणी वेळेवर देण्याची पंच मनिषा उसगांवकर यांची मागणी.

Goa Accident: नारळाच्या झाडावरून पडून 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

नारळाच्या झाडावरून पडून सिल्व्हेस्टर फिलिप (६०, चांदोर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Goa Accident:  धारबांदोडा अपघातात एकाचा मृत्यू

धारबांदोडा येथे रस्त्यावर पार्क केलेल्या कंटेनरला रिक्षाची धडक बसून सनित चंद्रा गीताल (२५, बाणास्तारी, मूळ पश्चिम बंगाल) याचा मृत्यू तर रिक्षा चालक उत्तम गवळी (४८, बाणास्तारी) हा जखमी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com