Goa News: गोव्यात उष्णतेची लाट; राज्यात यलो अलर्ट!! वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Today's Goa Marathi News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर घडामोडी
Goa News: गोव्यात उष्णतेची लाट; राज्यात यलो अलर्ट!! वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

गोव्यात उष्णतेची लाट; राज्यात यलो अलर्ट

IMD ने 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी कोकण आणि गोवा आणि उत्तर केरळमध्ये उष्णतेच्या वाढणाऱ्या प्रमाणामुळे यलो अलर्ट जारी केला आहे.

अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तत्पर व्हा: रेंट-अ-कॅब संघटना

विमानतळ तसेच रेल्वे स्थानकावर भाड्याने कार किंवा बाईक न घेण्यासाठी जारी केलीली नोटीस मागे घेण्याचे निवेदन उत्तर गोवा रेंट अ कॅब संघटनेने वाहतूक उप संचालकांना सादर केले. रेंट अ कार संघटनेला राज्यात कुठेही वाहन भाड्याने देण्याचा अधिकार आहे. तसेच ही नोटीस ८ दिवसांच्या आत मागे घ्यावी अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचा रेंट अ कॅब संघटनेचा वाहतूक विभागाला इशारा.

पर्वरीतील वटवृक्षाच्या स्थलांतराला उच्च न्यायालयाकडून परवानगी

वटवृक्षाच्या स्थलांतराचे प्रकरण मंगळवारी (दि.२५) उच्च न्यायालयाने निकाली काढले आहे. तज्ञांच्या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने सांगितले की पर्वरीतील वटवृक्षाचे स्थलांतर वन अधिकाऱ्यांकडून पर्यवेक्षण आणि नियंत्रण केले जाईल.: ॲड जनरल देविदास पांगम

रेंट-अ-कॅब वर जारी केलेली नोटीस मागे घेण्यासाठी उत्तर गोवा रेंट-अ-कॅब असोसिएशनने घेतली उपसंचालकांची भेट

२० फेब्रुवारी रोजी विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर भाड्याने कार किंवा बाईक घेऊ नये अशी जारी केलेली नोटीस मागे घेण्यासाठी उत्तर गोवा रेंट अ कॅब असोसिएशनने उपसंचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रेंट अ कार असोसिएशनला राज्यात कुठेही वाहन भाड्याने देण्याचा अधिकार आहे.असोसिएशनने ही नोटीस मागे घेण्यासाठी विभागाला ८ दिवसांचा वेळ दिलेला आहे.अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेसह परिणामांना सामोरे जावे लागेल अशी शिकवणी असोसिएशनने दिली आहे

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आयुष्मान आरोग्य मंदराचे उद्घाटन

दिगंबर कामत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते मोती डोंगर मडगाव येथे नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर - Uaam चे उद्घाटन करण्यात आले.

गाडीचा धक्का लागल्याने वाळपईत रानडुक्कर ठार

रेडेघाट, वाळपई येथे गाडीचा धक्का लागून रानडुक्कर ठार.

कोकणीसह मराठीचेही महत्त्व अबाधित, कोणाताही वाद नाही

गोव्यात कोकणी राज्यभाषा तर मराठी सहराज्यभाषा असून दोन्ही भाषा समानतेने चालत आहेत. दोन्ही भाषांचे महत्त्व अबाधित असून कोणाताही वाद नाही. केवळ गोव्यात परप्रांतीय लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नोकरीसाठी कोकणी सक्तीची करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात मराठीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न नाही - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डिचोलीत बंद घरात चोरी!

भायलीपेठ-डिचोली येथील बंद घरात चोरी. तांब्याच्या ढोलासह एक लाखापेक्षा अधिक किमतीची भांडी पळवली. पोलिसात तक्रार.

पर्वरीत यंदा कार्निवल व शिगमो रद्द!

यावर्षी पर्वरीत उड्डाणपुलाच्या कामामुळे कार्निवल तसेच शिगमो हे दोन उत्सव रद्द करण्याचा निर्णय पर्वरी शिगमोत्सव आणि कार्निवल समितीने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com