वाळपई, ‘शालेय सप्ताह’निमित्त सत्तरी तालुक्यातील धाटवाडा-पोडोशे सरकारी प्राथमिक विद्यालयात तिथी भोजनचा उपक्रम रविवारी राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व व आहाराविषयी ज्ञान होण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला होता.
पावसाळ्यात नैसर्गिक भाज्यांचा उगम भरपूर प्रमाणात होत असतो. मुलांना रानभाज्यांचे उपयोग व त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे याविषयी ज्ञान मिळण्यासाठी शाळेतील मुलांच्या पालकांनी विविध प्रकारच्या भाज्या, पौष्टिक पदार्थ बनवून शाळेत आणले होते.
आजची मुले ही जास्त करून ‘फास्ट फूड’च्या आहारी गेलेली दिसतात. तेलयुक्त पदार्थ खाण्याकडे मुलांची ओढ अधिक दिसते. मात्र, धाटवाडा-पोडोशे शाळेत मुलांना आपल्या परिसरात मिळणाऱ्या रानभाज्या, रानभाज्यांचे आहारातील महत्त्व व पौष्टिक पदार्थांविषयी आवड, माहिती होण्यासाठी अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविले जातात.
पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत उपक्रम राबविला.
तिथी भोजन उपक्रमात पालकांनी टाळखिळा, केळफुलाची भाजी, अळू, नाचणीची भाकरी, शेंगदाणा लाडू, कोंबाची भाजी असे विविध पदार्थ बनवून हा शालेय सप्ताह साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन दीप्ती पेडणेकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
पोडोशेला रानभाज्यांचे वरदान
पोडोशे हा जैवविविधतेने समृद्ध असा गाव आहे. या गावाला विविध प्रकारच्या रानभाज्यांचे वरदान लाभले आहे. मात्र, अलीकडील काळात या भाज्या दुर्लक्षित होत आहेत. या भाज्यांचे महत्त्व तसेच भाज्यांची माहिती व्हावी, भाज्यांची ओळख व्हावी, आवड व्हावी म्हणून शाळेच्या व पालकांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.