Morjim News : धारगळ येथे मानशीच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

Morjim News : तसेच पंचायत मंडळाने आपापल्या प्रभागांतील विकास कामांचा पाठपुरावा करणे आणि काम उत्कृष्ट पद्धतीने कसे होईल यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
Dhargal
Dhargal Dainik Gomantak

Morjim News : मोरजी, धारगळ पंचायत क्षेत्राचा विकास हा पंचायत मंडळ आणि नागरिकांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या मागणीनुसार केला जाईल. कोणताही विकास करत असताना नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असते.

तसेच पंचायत मंडळाने आपापल्या प्रभागांतील विकास कामांचा पाठपुरावा करणे आणि काम उत्कृष्ट पद्धतीने कसे होईल यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.

जलसिंचन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या देऊळवाडा येथील जुन्या मानसीच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ करतेवेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच अर्जुन कानोलकर, पंच सतीश धुमाळ, दिलीप वीर आदी उपस्थित होते.

Dhargal
Goa Live News Update 22 December 2023: वागातोर समुद्रात पर्यटकाचा बुडून मृत्यू; हणजूण पोलीस घटनास्थळी दाखल

आर्लेकर यांनी धारगळ पंचायत क्षेत्राचा विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. विकास करत असताना कसल्याच प्रकारचे कोणीही राजकारण करू नये, असे ते म्हणाले.

सरपंच अर्जुन कानोलकर यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांचे विकासाला वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.

याही पुढे सहकार्य करावे, असे आवाहन केले. पंच सतीश धुमाळ यांनी मानसी दुरुस्तीसाठी आपण आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे संपर्क साधला, त्यांनी लगेच पुढाकर घेत या कामाला मंजुरी मिळवून दिली, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com