Saligao Homekand: निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याचा थरार; साळगावचा होमखंड उत्साहात

Saligao Homekand: या होमखंडाचं वैशिष्ट्य म्हणजे होमखंडातून जाणाऱ्याला कसलेही उपासतापास करावे लागत नाहीत.
Saligao Homekand
Saligao Homekand
Published on
Updated on

Saligao Homekand

साळगाव या शेजारच्या गावातील लोकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या या गावातील आणखी एक सण म्हणजे नऊ दिवसांचा होळी उत्सव जो प्रसिद्ध होमखंडातील निखाऱ्यावर चालून गेल्यावर संपतो जिथे शेकडो गावकरी या निखाऱ्यांवरून चालत जातात.

या होमखंडाचं वैशिष्ट्य म्हणजे होमखंडातून जाणाऱ्याला कसलेही उपासतापास करावे लागत नाहीत.

या होमखंडाच्या विधीमध्ये धर्माचं बंधनदेखील नसते. परदेशी पर्यटक देखील या होमखंडातील निखाऱ्यावरून बिनधास्त चालत जातात. साळगावात काल नऊ दिवसाची धुळवड, शिमगा व होमखंड मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले.

ज्येष्ठ ग्रामस्थ चंद्रकांत घाडी साखळकर यांनी वर्ष पद्धतीने गावातील ग्रामदैवते श्री शर्वणी, श्री वेताळ, श्री राष्ट्रोळी आणि श्री वडेश्वर यांना गाह्राणे घालून, त्या देवांचे आशीर्वाद घेऊन उत्सवाची सुरुवात केली.

दुपारी शर्वणी मंदिर सालमोणा, धनवाडे येथील परुळेकरांचे निवासस्थान, मळेभाट येथील श्री वेताळ मंदिर या ठिकाणी आशीर्वाद घेतले. तिथे १० मीटर उंच होळीवर‌ बांधलेला नारळ काढण्याची तरुणांची आवडती प्रथा पार पाडताना एक वेगळंच रोमहर्षक वातावरण जाणवते.

Saligao Homekand
Goa Mango & Vegetable Prices: गोव्याचा मानकुराद खातोय भाव; लिंबू, फळेही महागली, गावठी भाज्यांना वाढती मागणी

सर्वधर्मीयांचा सहभाग

देव राष्ट्रोळीचा आशीर्वाद घेण्यासाठी रोमट मिरवणूक नंतर मुड्डावाडो येथील धालाच्या मांडावर येते.रात्री १० वाजता आगीतून चालण्याच्या प्रथेला सुरूवात होते. या होमकुंडातून सर्वधर्मीय शेकडो लोक सामील होतात.

या वर्षी ख्यातनाम लेखक विवेक मिनेझिस, गायक अक्षय नाईक अनेक छायाचित्रकार मुद्दाम हा सोहळा पाहण्यासाठी आले होते. हा वार्षिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्राम घाडी साखळकर, उदय साळगावकर , पुंडलिक पेडणेकर,प्रदीप फडते, एकू पालयेकर व रमेश घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com