गोव्यात दिवसाला आढळतायेत 3 ते 4 मद्य व्यसनाधीन; आरोग्य मंत्र्यांनी दिली धक्कादायक आकडेवारी
AlcoholDainik Gomantak

Chronic Alcoholism: गोव्यात दिवसाला आढळतायेत 3 ते 4 मद्य व्यसनाधीन; आरोग्य मंत्र्यांनी दिली धक्कादायक आकडेवारी

Chronic Alcoholism In Goa: 2019-2023 या काळात उत्तर गोव्यात मद्य व्यसनाच्या आहारी गेलेल्या 1,673 तर दक्षिण गोव्यात 4,623 प्रकरणं समोर आलीयेत.
Published on

गोव्यात गेल्या पाच वर्षापासून दिवसाला सरासरी तीन ते चार मद्य व्यसनाधीन व्यक्ती आढळत आहेत. वैद्यकीय पुनर्वसन केंद्राच्या आकडेवारीच्या हवाल्याने राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभा अधिवेशनात ही माहिती दिली.

बांबोळी येथील मानसोपचार व मानवी वर्तणूक संस्थेत (IPHB) 2019 ते मे 2024 या काळात दिवसाला 3 ते 4 मद्य व्यसनाधीन व्यक्ती आढळ्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी सभागृहात सांगितले. गुरुवारी (25 जुलै) आरोग्य विभागासंबधित विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री राणे यांनी वरील माहिती दिली.

2019-2023 या काळात उत्तर गोव्यात मद्य व्यसनाच्या आहारी गेलेल्या 1,673 तर दक्षिण गोव्यात 4,623 प्रकरणं समोर आलीयेत. अति मद्यसेवन करणारे व्यक्ती कालांतराने व्यसनाधीन होतात. मद्य अथवा अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी गोवा राज्य सरकारच्या वतीने दक्षिण आणि उत्तर गोव्यात पुनर्वसन केंद्र उभारली आहेत.

गोव्यात दिवसाला आढळतायेत 3 ते 4 मद्य व्यसनाधीन; आरोग्य मंत्र्यांनी दिली धक्कादायक आकडेवारी
Goa Monsoon: गोव्याला वादळी वाऱ्याचा तडाखा! पडझडीत घरांचे नुकसान, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत

2023 मध्ये दोन्ही जिल्हा रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर गोव्यात 522 तर दक्षिण गोव्यात 1,168 रुग्ण रेफर करण्यात आले. तसेच, IPHB 523 रुग्णांना रेफर करण्यात आले. ही आकडेवारी गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

समुदेशकांच्या मदतीने मद्याच्या आहारी गेलेल्या लोकांचे समुपदेशन करुन त्यांना या केंद्रात रेफर केले जाते असे मंत्री राणे म्हणाले.

वैद्यकीय अधिकारी, विशेष मनोचिकित्सक, मानसोपचार सल्लागार, कर्मचारी परिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPHW) यांचे पथक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत, असे राणे यांनी सभागृहात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com