Illegal Sand Mining: कुडतरीत बेकायदेशीर रेती उत्‍खनन : तीन हाेड्या जप्‍त

भरदिवसा झुआरी नदीत सक्‍शन पंप लावून बेकायदेशीररीत्‍या रेती उत्‍खनन करण्‍याचा प्रयत्‍न किनारपट्टी पोलिसांनी उधळून लावला.
Illegal Sand Mining
Illegal Sand MiningDainik Gomantak

Illegal Sand Mining: भरदिवसा झुआरी नदीत सक्‍शन पंप लावून बेकायदेशीररीत्‍या रेती उत्‍खनन करण्‍याचा प्रयत्‍न किनारपट्टी पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी आल्‍याचे पाहून या होड्या चालविणाऱ्या कामगारांनी नदीत उडी घेऊन तेथून पळ काढला.

Illegal Sand Mining
Ganesh Festival 2023 फोंड्यात प्लास्टर ऑफ पॅरिसला फाटा शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध

पोलिसांनी याची माहिती भरारी पथकाला दिल्‍यानंतर भरारी पथकाने या तिन्‍ही होड्या आणि सक्‍शन पंप जप्‍त केला. शुक्रवारी (ता.१) ही घटना घडली.

बेतूल किनारपट्टी पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक सूरज सामंत हे पोलिस शिपाई सचिन गडेकर व मुकेश पाडलाेसकर यांच्‍याबरोबर नदीकिनारी गस्‍त घालत असताना या तीन होड्या रेती उत्‍खनन करण्‍यासाठी नदीत उतरल्‍याचे त्‍यांनी पाहिले.

Illegal Sand Mining
Human Trafficking in Goa: गोव्यात जगभरातून मानवी तस्करी

त्‍यामुळे सामंत यांनी त्‍यांचा पाठलाग केला असता खलाशांनी या होड्या फिरवून झुआरी नदीच्‍या तीरावर आणल्‍या आणि पाण्‍यात उडी घेऊन ते पसार झाले.

‘त्या’ होड्यांचे मालक कोण?

या घटनेची माहिती पोलिसांनी भरारी पथकाला दिल्‍यानंतर सासष्‍टीचे मामलेदार, कॅप्‍टन ऑफ पोर्ट आणि खाण खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी येऊन या होड्या ताब्‍यात घेतल्‍या. या होड्या नेमक्‍या कोणाच्‍या याची माहिती अजून न मिळाल्‍याने सध्‍या अज्ञाताविरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आल्‍याची माहिती मामलेदारांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com