Goa News: कुक्कुटपालनासाठी यंदा एकही अर्ज नाही

केवळ 5 शेतकऱ्यांनी पोल्ट्री फार्म पायाभूत सुविधा योजनांचा लाभ घेतला
poultry
poultry

धीरज हरमलकर

पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुटपालन योजनांसाठी या वर्षी शून्य अर्ज आले आहेत. गतवर्षी केवळ 5 शेतकऱ्यांनी पोल्ट्री फार्म पायाभूत सुविधा योजनांचा लाभ घेतला आहे.

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. काही वर्षांपूर्वी कुक्कुटपालन योजनेला चांगले लाभार्थी मिळत होते, मात्र गेल्या काही वर्षांत त्यात घट झाली आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. शिरीष बेतकेकर यांनी सांगितले की, आतापर्यंत एकाही शेतकऱ्याकडून कुक्कुटपालन आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज आलेला नाही. तसेच अंडी घालणाऱ्या कोंबड्या आणि ब्रॉयलरच्या संगोपनासाठी आर्थिक मदत आहे त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही.

poultry
Goa Raj Bhavan: राजभवनावर रक्त चंदन उद्यान; राज्यपालांनी केले वृक्षारोपण

डॉ. बेतकेकर यांनी सांगितले की, कुक्कुटपालन संबंधित दोन योजना आहेत. एका योजनेत कोंबड्यांच्या संगोपनासाठी मासिक आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत शेतकऱ्यांना जवळपास ८० टक्के अनुदान दिले जाते.

गेल्या वर्षी संपूर्ण गोव्यात केवळ ११ शेतकऱ्यांनी ही योजना घेतली होती. ब्रॉयलरचे फार्म बांधण्यासंबंधीत योजनेत ७५ टक्के पायाभूत सुविधांचा खर्च विभागाकडून केला जातो, ६ लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते.

अंडी घालणाऱ्या कोंबड्यांच्या फर्मच्या बाबतीत ते २१ लाखांपर्यंत जाते आणि लो इनपुट तंत्रज्ञानाच्या बाबतीत ६ लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य केले जाते. गतवर्षी या कुक्कुटपालन योजनेचा लाभ केवळ ५ शेतकऱ्यांनी घेतला, असे ते म्हणाले.

या योजनांसाठी पशुसंवर्धन विभागाकडे नवीन अर्ज आले आहेत का, असे विचारले असता, या योजनांसाठी अद्याप एकही नवीन अर्ज आलेला नाही. पंचायत क्षेत्रात माहिती देऊन आणि जनजागृती करूनही क्वचितच कोणी शेतकरी या योजनांचा पर्याय निवडत आहेत, असे ते पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com