Bicholim: डिचोलीत स्वच्छतागृहाला टाळे

Bicholim: बाजारातील विक्रेत्यांसह ग्राहकांची प्रचंड गैरसोय
fish-market
fish-marketDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim:

बाजाराच्या दिवशी आज (बुधवारी) डिचोलीच्या बाजारातील सार्वजनिक स्वच्छतागृहाला टाळे लावण्याचा प्रकार घडला. आठवडी बाजाराच्या दिवशीच स्वच्छतागृह बंद राहिल्याने विक्रेत्यांसह बाजारहाटीसाठी आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.

या गैरसोयीमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी तेवढाच संताप व्यक्त करण्यात येत होता. बाजारातील मासळी मार्केट जवळ असलेल्या या स्वच्छतागृहाची सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस संघटनेतर्फे देखभाल करण्यात येते. मात्र बुधवारी (ता.20) सकाळपासूनच या स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वाराला टाळे लावून ते बंद ठेवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्वच्छतागृहाची ''सेप्टीक टाकी'' तुंबल्याने हे स्वच्छतागृह बंद करण्याची पाळी आली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. स्वच्छतागृह बंद राहिल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांना मात्र सोयीस्कर अशा ठिकाणी धाव घ्यावी लागली.

fish-market
Political Reservation: एसटी राजकीय आरक्षण : श्रेय लाटण्यासाठीचा नवा वाद सुरू

आठवडाभरापासून समस्या

गेल्या आठवडाभरापासून स्वच्छतागृहात समस्या निर्माण झाली असून, अधूनमधून हे स्वच्छतागृह बंद ठेवण्यात येत आहे. गेल्या बुधवारीही (ता.१३) आठवडा बाजाराच्या दिवशी हे स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आले होते. गेल्या आठवडी बाजाराच्या दिवशीही विक्रेत्यांसह ग्राहकांना वाईट अनुभव आला होता. मात्र तरी अजूनही सेप्टीक टाकीचा उपसा करण्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली.

fish-market
Lok Sabha Election: उमेदवारीचा पेच कायम; पण वैयक्तिक पातळीवर प्रचार सुरू

कर्मचाऱ्याचे पलायन

स्वच्छतागृहाला टाळे लावण्यात आले असले, तरी सकाळपर्यंत देखभाल करणारा एक कर्मचारी त्याठिकाणी होता. यासंबंधी या संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता, सेप्टीक टाकी तुंबल्याने स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आले आहे. एवढेच स्पष्टीकरण त्याने दिली. अधिक माहिती देण्याचे मात्र त्यांनी टाळले.

नैसर्गिक विधीसाठी येणाऱ्या विक्रेते आणि ग्राहकांना तोंड देण्याचे टाळण्यासाठी अखेर त्याने तेथून पलायन केले. सायंकाळपर्यंत हा कर्मचारी स्वच्छतागृहापाशी फिरकलाच नाही. भर आठवडी बाजाराच्या दिवशी स्वच्छतागृह बंद राहिल्याने विशेष करुन महिला विक्रेत्या आणि ग्राहकांचे प्रचंड हाल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com