Panjim Smart City: 'ये दिल मांगे मोर', स्मार्ट सिटीत पुन्हा रुतला ट्रक, काँग्रेसची सरकारवर खोचक टीका

मागील दोन महिन्यात मालवाहतूक ट्रक रस्त्यात रुतण्याचे बरेच प्रकार घडले आहेत.
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Smart City 'स्मार्ट सिटी'च्या धिम्यागतीने चालणाऱ्या कामाचा फटका पुन्हा एकदा माल वाहक ट्रकला बसला आहे. पणजी नजीकच्या मळा भागात शीतपेयांच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या या ट्रकाचे मागील चाक रुतले असून हा ट्रक एका बाजूने कलंडला आहे.

सदरची घटना आज दुपारी घडली. गोवा काँग्रेसने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ''भ्रष्ट आणि असंवेदनशील भाजप सरकारसाठी "ये दिल मांगे मोर'' सारखा हा क्षण'' असल्याचा उपहासात्मक टोला लगावला आहे.

Panjim Smart City
Margao News: मडगाव येथे विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

दरम्यान मागील दोन महिन्यात मालवाहतूक ट्रक रस्त्यात रुतण्याचे बरेच प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी पणजी सांतीनेज परिसरातील शीतल हॉटेलजवळ एक ट्रक रस्त्यात रुतून पूर्णपणे कलंडल्याने पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

'स्मार्ट सिटी'अंतर्गत पणजी शहरात रस्त्यांची कामे सुरु आहेत. जागोजागी रस्ते खणल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय तसेच पायी प्रवास करणाऱ्यांना देखील जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com