हायकोर्टाचा निर्णय! हजेरीपट कमी असतांनाही परीक्षेस बसण्यास मोकळीक; वाचा नेमकं प्रकरण?

हजेरीपट कमी असल्याने एमबीबबीएसच्या प्रथम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला होता.
हायकोर्टाचा निर्णय! हजेरीपट कमी असतांनाही परीक्षेस बसण्यास मोकळीक; वाचा नेमकं प्रकरण?
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

हजेरीपट कमी असल्याने एमबीबबीएसच्या प्रथम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. याप्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली. एवढ्यावरच न थांबता न्यायालयाने त्याचा निकाल बंद लिफाफात ठेवण्याचाही आदेश जारी केला.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात लक्ष्मी जैन यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्य सरकार, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा विद्यापीठ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला जैन यांनी प्रतिवादी केले होते. लक्ष्मी जैन गोमॅकोत एमबीबबीएसच्या प्रथम वर्षात शिकत आहेत.

हायकोर्टाचा निर्णय! हजेरीपट कमी असतांनाही परीक्षेस बसण्यास मोकळीक; वाचा नेमकं प्रकरण?
Mumbai High Court: व्यापाऱ्याला 35 वर्षांनी न्याय; ईडीने जप्त केलेले पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश

12 आणि 13 ऑगस्ट रोजी शरीरशास्त्र विषयाची परीक्षा होणार होती. मात्र शरीरशास्त्र विषयात आवश्यक हजेरी कमी असल्याने जैन यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. याप्रकरणी जैन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असता, याचिकाकर्त्या लक्ष्मी जैन यांच्यावतीन याचिकादारातर्फे अॅड. दत्तप्रसाद लवंदे यांनी बाजू मांडली. त्यांनी यावेळी न्यायालयात शरीरशास्त्र थिअरीमध्ये पुरेशी हजेरी असल्याची तर प्रात्यक्षिकमध्ये कमी हजेरी असल्याची माहिती दिली. त्यामुळे जैन यांनाही परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी यावी अशी मागणी लवंदे यांच्याकडून न्यायालयात करण्यात आली. दुसरीकडे मात्र प्रतिवादी वकिलांकडून यावर आक्षेप घेण्यात आला.

हायकोर्टाचा निर्णय! हजेरीपट कमी असतांनाही परीक्षेस बसण्यास मोकळीक; वाचा नेमकं प्रकरण?
Mumbai High Court: चला पुन्हा या! वकिलाची छोटीशी चूक अन् सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. न्यायालयाने 12 आणि 13 ऑगस्ट रोजी परीक्षा होत असल्याचे दखल घेत आपला निर्णय सुनावला. एवढचं नाही तर न्यायालयाने एक पाऊल पुढे टाकत संबंधित परीक्षेचा निकाल बंद लिफाफात ठेवण्याचा आदेशही दिला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com