थायलंड, इंडोनेशिया का गोवा? डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी सर्वात स्वस्त कोणते ठिकाण, Agoda चा सर्व्हे

डिसेंबरमध्ये जगभरातील पर्यटन ठिकाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
Affordable Tourist Places In December 2023
Affordable Tourist Places In December 2023

Affordable Tourist Places In December 2023: बघता बघता 2023 या वर्षाचे देखील आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. वर्षाखेरीस कुठे फिरायला जायचे याचे प्लॅनिंग आत्तापासूनच लोक करायला लागले आहेत. डिसेंबरमध्ये जगभरातील पर्यटन ठिकाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Agoda पर्यटकांना स्वस्त पर्यटन ठिकाणांची माहिती देत असते, अलिकडेच या संकेतस्थळाने एशिया पॅसिफिकच्या जवळची सर्वात स्वस्त पर्यटन स्थळांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म Agoda ने डिसेंबर 22 ते 31 दरम्यान पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या विविध ठिकाणावरील खोलीभाडे सरासरी किती असेल याचे विश्लेषण केले आहे. भारतात, गोवा हे सर्वात परवडणारे पर्यटन स्थळ असल्याचे Agoda ने म्हटले असून, येथे खोलीभाडे सरासरी 7,621 रुपये आहे.

आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात कमी सरासरी निवास दर असलेली इतर ठिकाणे कोणती?

थायलंडमधील हॅट याई, इंडोनेशियातील योग्याकार्टा, मलेशियामधील कुचिंग, व्हिएतनाममधील दलात, भारतातील गोवा, फिलीपिन्समधील बागुयो, जपानमधील नागोया, तैवानमधील ताइचुंग, मेलबर्नमधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियातील बुसान. Hat Yai मध्ये खोलीभाडे सरासरी 3,562 रु तर बुसानमध्ये 13,088 रु पर्यंत आहे.

गोवा सुंदर समुद्रकिनारे, नाइटलाइफ, वैविध्यपूर्ण बाजारपेठ आणि सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक येथे हजेरी लावत असतात.

कोरोनानंतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावत ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावर्षी देखील अशाच प्रकारची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com