Sarvan Primary School : सर्वणच्या प्राथमिक शाळेसमोर दलदल

Sarvan Primary School : सर्वणच्या प्राथमिक शाळेसमोर तर तळे निर्माण झाले. पाणी शाळेच्या उंबरठ्यापर्यंत पोचले होते.
Sarvan Primary School
Sarvan Primary SchoolDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली, सर्वण येथील सरकारी प्राथमिक शाळेसमोर सध्या चिखलाची दलदल निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत. लहान मुलांना सध्या चिखलाच्या दलदलीतून वाट काढून शाळेत जावे लागत आहे.

गेल्या ७ जुलै रोजी कोसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यावेळी सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली होती. सर्वणच्या प्राथमिक शाळेसमोर तर तळे निर्माण झाले. पाणी शाळेच्या उंबरठ्यापर्यंत पोचले होते.

पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून आली होती. मातीचा निचरा झाला नसल्याने ही माती शाळेसमोरच साचली आहे. सध्या या मातीपासून चिखलाची दलदल निर्माण झाली आहे.

Sarvan Primary School
India To Mandate USB-C: भारतात 2025 पर्यंत स्मार्टफोनसाठी अनिवार्य होणार यूएसबी-सी पोर्ट? जाणून घ्या यामागचे कारण

रोगराईची भीती

शाळेसमोरील पटांगणावर चिखलाची दलदल निर्माण झाल्याने मधल्या सुटीत मुलांना धड खेळायलाही मिळत नाही. चिखलामुळे डासांची पैदास वाढली आहे.

डासांमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन मलेरिया, डेंग्यू यासारखे भयानक रोग पसरण्याची शक्यता आहे. तशी भीतीही पालक व्यक्त करीत आहेत. संबंधितांनी या समस्येकडे लक्ष घालून शाळेसमोरील पटांगण चिखलमुक्त करावे. अशी मागणी पालकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com