पणजी, सुरईश संस्थेच्या १३ व्या वर्धापनदिना निमित्त पणजी येथे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) च्या सभागृहात शनिवार ९ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता, ''सूर निरागस हो'' हा खास कार्यक्रम आयएमबीच्या सहयोगाने आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केलेली, अवीट गोडीची भावमधुर मराठी भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, निवडक चित्रपटगीते, युगुलगीते ऐकण्याची संधी रसिकांना लाभणार आहे.
यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ‘डिसायपल’ या चित्रपटासाठी गायन केलेली व ‘ईटीव्ही- गौरव महाराष्ट्राचा’ची मानकरी केतकी चैतन्य, ‘सुर नवा ध्यास नवा’च्या महाअंतिम फेरीचा मानकरी नवाब शेख आणि भावमधुर आवाजाची नव्या दमाची युवा गायिक नव्या भट गाणार आहेत.
महाराष्ट्रातील नामवंत निवेदक प्रफुल्ल वालावलकर हे या कार्यक्रमाचे निवेदन करतील तर नितीन कोरगावकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (सिन्थेसायझर), शुभम नाईक (संवादिनी), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड) व तारानाथ होलगद्दे (तालवाद्य) या वादकांची त्यांना साथसंगत असेल. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.