St. Francis Xavier DNA Controversy: सुभाष वेलिंगकर गोव्याबाहेर? शक्तीप्रदर्शन करत पोलिसांना शरण येण्याची मोर्चेबांधणी; भूमिगत बैठका सुरु!

Subhas Velingkar: राज्यभर ख्रिस्ती समुदायाकडून शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर आता तपासासाठी शरण येताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा वेलिंगकर यांचा विचार असल्याची माहिती मिळाली आहे.
St. Francis Xavier DNA Controversy: वेलिंगकर गोव्याबाहेर? शक्तीप्रदर्शन करत पोलिसांनी शरण येण्याची मोर्चेबांधणी; भूमिगत बैठका सुरु!
Subhas VelingkarDainik Gomantak
Published on
Updated on

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनापासून दिलासा न मिळालेल्या सुभाष वेलिंगकरांनी उच्च न्यायालयात अद्याप जिल्हा न्यायालयाच्या निवाड्याला आव्हान दिलेले नाही. त्यांच्याविरोधात राज्यभर ख्रिस्ती समुदायाकडून शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर आता तपासासाठी शरण येताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा वेलिंगकर यांचा विचार असल्याची माहिती मिळाली आहे.

वेलिंगकर यांच्याविरोधात भाजपचे सरकार सत्तारुढ असताना गुन्हा दाखल होणार नाही असे त्यांच्या पाठीराख्यांना वाटत होते. ख्रिस्ती समुदायाने तो गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्यानंतर वेलिंगकर यांना राहते घर सोडून पत्ता बदलावा लागला आहे. त्यांच्या घराच्या दारावर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्याच्या दोन नोटिसा चिकटवूनही त्यांनी पोलिसांना दाद दिलेली नाही. न्यायालयात त्यांनी झुंडशाहीमुळे आपल्याला अटक होऊ शकते त्यामुळे आपण पोलिसांसमोर गेलो नाही असे कारण त्यांनी पुढे केले होते.

जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन न दिल्याने त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या नव्या घडामोडीनंतर वेलिंगकर यांचे समर्थक भूमिगत पद्धतीने बैठका घेऊ लागले आहेत. वेलिंगकर हे एकटे नाहीत तर त्यांचा विचार मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे हे दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आम्ही कायदा मानणारे आहोत असे दर्शवण्यासाठी पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्याची भूमिका वेलिंगकर यांच्याकडून घेतली जाऊ शकते. यासाठी डिचोली पोलिसात मोठ्या जमावासह हजर होण्याची योजना आकाराला आणली जात आहे. पोलिसांना मात्र वेलिंगकर सापडू शकत नसल्याने सरकारची त्यांना अटक करण्याची इच्छाच नाही असा राज्यभरात समज पसरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com