भटक्या कुत्र्यांवरील कार्यक्रमास नगरसेवकांची दांडी!

नगरपालिकेला सरकारी योजनेचा लाभ घेऊन भटक्‍या कुत्र्यांच्‍या समस्येचा मुकाबला करणे शक्य आहे.
Dogs
DogsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: डब्ल्यूव्हीएलचे (WVL) संचालक डॉ. कार्लोट फर्नांडिस (Dr. Charlotte Fernandes) यांनी सोमवारी मडगाव नगरपालिकेच्या (Margao Municipal) सभागृहात नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्‍या भटक्या कुत्र्यांवरील सादरीकरणास अधिकतम नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे या समस्येबाबत ते खरोखरच गंभीर आहेत का, असा प्रश्र्न उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

या सादरीकरणास नगराध्यक्ष लिंडन परेरा, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, घनश्याम शिरोडकर, दादा नायक, व्हितोरिन तावारीस, जॉनी क्रास्तो, कामिल बार्रेटो, महेश आमोणकर, राजू नाईक व लता पेडणेकर एवढीच मंडळी उपस्थित होती. खुद्द नगराध्यक्ष सादरीकरण चालू असताना अधूनमधून चेंबरमध्ये येत जात होते. एकदा तर आमोणकर यांनी त्यांना चेंबरमध्ये जाऊन बोलावून आणले. नगरसेवकांच्या अनुपस्थितीबीबत त्‍यांना विचारले असता, सर्वांना सादरीकरणाबाबत सूचित केले होते, ते का अनुपस्थित राहिले ते कळले नाही असे त्‍यांनी सांगितले.

Dogs
Goa: ६० वर्षानंतर तेरेखोल गावाला होणार गोव्यातून वीज पुरवठा

सादरीकरणावेळी डॉ. कार्लोट यांनी सांगितले की, नगरपालिकेला सरकारी योजनेचा लाभ घेऊन भटक्‍या कुत्र्यांच्‍या समस्येचा मुकाबला करणे शक्य आहे. गोवा स्‍मॉल एनिमल रेस्क्यू मॅनेजमेंट स्कीम 2014 ही त्‍यासाठी सरकारी योजना असून, अनेक पंचायती तसेच पालिकांनी तिचा लाभ घेतलेला आहे.

सदर योजनेअंतगंत पालिकेला भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पिंजरे ठेवण्याकरिता जागा उपलब्ध करावी लागेल. तसेच कुत्री पकडण्यासाठी व्हॅन उपलब्ध करावी लागेल. त्यासाठी सदर योजनेतून निधी मिळविता येतो. मडगाव पालिकेला जागेची समस्या असेल तर जिल्हाधिकाऱ्यां कडून सोनसोडो पशुदवाखाना परिसरातील एखादा निवासी गाळा मिळविता येण्यासारखा आहे, ही बाब लक्षात आणून देण्‍यात आली. नगराध्यक्ष लिंडन यांनी सादरीकरणावेळी पुढे आलेले प्रस्ताव पालिका बैठकीसमोर ठेवले जातील असे स्पष्ट केले.

Dogs
Goa: बेकायदा बांधकाम पाडले बंद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com