Goa BJP: गोव्यात 'या ठिकाणी' होणार भाजपचे नवे भव्य आणि सुसज्ज मुख्यालय; प्रदेशाध्यक्षांनी दिली माहिती

Goa BJP: या कार्यालयाचे उद्‍घाटन भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात येईल- तानावडे
Sadananda Shet Tanawade
Sadananda Shet TanawadeDainik Gomantak

Goa BJP: प्रदेश भाजपचे नवे भव्य आणि सुसज्ज असे मुख्यालय लवकरच पणजी-फोंडा राष्ट्रीय महामार्गावरील चिंबल परिसरात उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाले असून, लवकरच बांधकाम हाती घेण्यात येईल.

या कार्यालयाचे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येईल, अशी माहिती राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Sadananda Shet Tanawade
Breast cancer रुग्णांसाठी आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 'फेसगो' इंजेक्शन मिळणार मोफत

भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्याशी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे मुख्य कार्यालय सध्या पणजीत कार्यरत आहेत.

परंतु, हे कार्यालय कामासाठी अपुरे पडत असल्यामुळेच चिंबल येथे नवे सुसज्ज आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असलेले कार्यालय बांधण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.

कार्यालय उभारणीबाबतच्या कायदेशीर प्रक्रिया आणि कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे लवकरच कार्यालयाचे बांधकाम हाती घेण्यात येईल, असे तानावडे यांनी सांगितले.

मोदींच्या सभेला 50 हजारांची गर्दी अपेक्षित

येत्या 6 फेब्रुवारीला मडगावच्या कदंब बसस्थानकाच्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘विकसित भारत प्रदर्शना’चे उद्‌घाटन व त्याचबरोबर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेस 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे व त्यासाठी सर्व तयारीला सुरवात झाल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले.

मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार नरेंद्र सावईकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, कदंब महामंडळ, सार्वजनिक बांधकाम तसेच पोलिस अधिकारी तयारीची पाहणी करण्यास उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com