ST Reservation: 'बाबू आजगावकर यांनी एसटी समाजाची दिशाभूल करु नये'

माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यानी वेगवेगळी विधाने करुन एसटी समाजाची दिशाभूल करु नये, असे दिकरपाल दवर्ली पंचायतीचे सरपंच हेर्कुलान नियासो यांनी सांगितले.
ST Reservation|Babu Ajgaonkar
ST Reservation|Babu AjgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

ST Reservation: माजी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यानी वेगवेगळी विधाने करुन एसटी समाजाची दिशाभूल करु नये, असे दिकरपाल दवर्ली पंचायतीचे सरपंच हेर्कुलान नियासो यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दवर्लीतील 165 बेकायदेशीर घरांना घर नंबर देणे व गांधी मार्केट ही वेगवेगळी प्रकरणे आहेत. गांधी मार्केटमधील एसटी समाजातील महिलांना बोलावून त्यांची घर नंबर प्रकरणी दिशाभूल करु नये, असे नियासो सांगितले.

गांधी मार्केट हे बाबू आजगावकर यांच्या मालकीचे नाही. त्यावर मडगाव नगरपालिकेचा हक्क आहे असेही नियासो म्हणाले.

ज्या शेतजमिनीवर ही बेकायदेशीर घरे बांधली आहेत त्यातील कुळांनी त्याविरुद्ध आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत, असेही सरपंचाने सांगितले.

चर्चेत असलेल्या शेत जमिनीवर घरे बांधता येतात की नाही या बद्दल नगर नियोजन खात्याचे मंत्री या नात्याने विश्र्वजीत राणे यांनी व सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मागणीही सरपंचाने केली आहे.

जर आमदार उल्हास तुयेकर व जिल्हा परिषद सदस्य परेश नाईक यानी या 165 घरांना घर नंबर देण्याचे वचन दिले असल्यास ते आमदार व जिल्हा परिषद सदस्याने पहावे. त्यात आमचा सहभाग नसल्याचे उपसरपंच मिशेल मिरांडा यानी सांगितले. या पत्रकार परीषदेत उपसरपंच मिशेल मिरांडा, पंच मेनिनो कुलासो, मायला रायकर उपस्थित होते.

ST Reservation|Babu Ajgaonkar
Agriculture Minister Ravi Naik: फोंड्याला चांगले ते नेहमीच दिले..!

आपण तीन वर्षे पंच म्हणून निवडून येत आहे व कधीही कोणावरही अन्याय केलेला नाही. या 165 घर मालकांनी कायद्याप्रमाणे फॉर्म 1 आणि 14, साईट प्लॅन, सर्वे प्लॅन ही कागदपत्रे सादर करावी, आमचा घर नंबर देण्यास मुळीच विरोध नसेल.

घर नंबर देण्याचा प्रश्‍न यापूर्वीच पंचायतीच्या बैठकीत चर्चिला असून जो पर्यंत कागदपत्रे सादर होत नाहीत तो पर्यंत घर नंबर न देण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. तसेच या प्रकरणी 22 जानेवारी 2023 रोजी खास ग्रामसभा बोलावून चर्चा केली जाईल. - हेर्कुलान नियासो, सरपंच, दिकरपाल-दवर्ली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com