Panaji News : आता केवळ काही तास उरले; कसरत मात्र सुरूच

Panaji News : सांतिनेजमध्‍ये अरुंद मार्गावरून जाण्यासाठी दुकाचीस्वारांची गर्दी
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, सांतिनेजमधील विवांता हॉटेल काँक्रीटीकरण केलेले मार्ग मंगळवारी रात्री वाहतुकीस खुले होणार आहेत. परंतु सध्या या ठिकाणी दुचाकीस्वारांकडून जवळचा मार्ग काढण्यासाठी कसरत सुरू असताना दिसत आहे.

ख्रिश्‍चन समुदायाच्या दफनभूमीच्या कोपऱ्यावरून अरुंद मार्गावरून दुचाक्यांवरून ये-जा करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ मोठी गर्दी दिसून येत आहे.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्यावतीने स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहरातील तयार झालेले स्मार्ट रस्ते वाहतुकीस खुले होत आहेत. त्यातील सिंगबाळ बूक स्टॉल ते महालक्ष्मी मंदिर मार्ग सोमवारी सायंकाळी वाहतुकीस खुला झाला.

Panaji
Flights To Goa: छत्रपती संभाजीनगर ते गोवा थेट विमानसेवेची घोषणा, जूनपासून आठवड्याला तीन फ्लाईट्स

मंगळवारी रात्री नऊ वाजता सांतिनेजमधील काँक्रीटीकरण केलेला विवांता हॉटेल चौक ते वेलनेस मेडिकल व तेथून मधुबन जंक्शन आणि काकुलो जंक्शन हे दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले होणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा येईल, असे दिसते. सांतिनेजमधील दोन्ही मार्ग खुले झाल्याने बांदोडकर मार्गावरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे.

प्रकार जीवावर बेतणारा!

सांतिनेजमधील रस्ता काँक्रिटीकरण झाले असले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पदपथाची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी चेंबरची कामे सुरू आहेत, त्यामुळे त्या कामासाठी आणलेले साहित्य रस्त्याच्या बाजूला टाकलेले आहे. काही चेंबरच्या ठिकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून लोखंडी बॅरेगेट उभारले असले तरी वाहनधारकांनी सावधानता बाळगून वाहने हाकावीत.

अर्धवट रस्ते सुरू असतानाही अनेक दुचाकीस्वार चारचाकी वाहनधारक रात्रीचे या मार्गावर भरधाव जाताना दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार जिवावर बेतू शकतो, हे वाहनधारकांना लक्षात घ्यावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com