Quepem: खळबळजनक! सेंट फ्रान्सिस झेवियरच्या मूर्तीची चोरी; केपे पोलिसांनी नोंदवला गुन्हा

St. Francis Xavier Statue Theft In Quepem: केपे, अमोना येथील सेंट फ्रान्सिस कॉलनीतील घर क्रमांक 171 येथून सेंट फ्रान्सिस झेवियर यांची मूर्ती चोरीला गेली.
St. Francis Xavier Statue Theft In Quepem
St. Francis Xavier Statue TheftDainik Gomantak
Published on
Updated on

St. Francis Xavier Statue Stolen from Quepem Police Investigation Underway

केपे: केपे येथून शुक्रवारी (7 मार्च) सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या मूर्तीच्या चोरीची घटना समोर आली आहे. दिकरपाली येथील तळपा खुरीस येथे असलेल्‍या सेंट जुझे वाझ यांच्‍या मूर्तीची मोडतोड आणि सेंट जोजफ कॉन्‍व्‍हेंट आवारात असलेली फातिमा सायबिणीची मूर्ती गायब झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

केपे (Quepem), अमोना येथील सेंट फ्रान्सिस कॉलनीतील घर क्रमांक 171 येथून सेंट फ्रान्सिस झेवियर यांची मूर्ती चोरीला गेली. ही मूर्ती काचेच्या फ्रेममध्ये ठेवण्यात आली होती. काचेच्या फ्रेममधून काढून चोरट्याने ही मूर्ती लंपास केली. या चोरीच्या घटनेसंबंधी कलम 305 (D) अंतर्गत केपे पोलिसांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मूर्ती चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा शोध घेवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

फातिमा सायबिणीची मूर्तीही गायब झाली

दरम्यान, सेंट जोजफ कॉन्‍व्‍हेंट आवारात असलेली फातिमा सायबिणीचीही मूर्ती गायब झाली. या भागातील सीसीटीव्‍ही फुटेजमध्ये एक मुलगा ही मूर्ती घेऊन जात असल्‍याचे दिसून आले. पोलिसांना हे फुटेज देण्यात आले आहे. क्रॉस मोडतोड आणि मूर्ती गायब प्रकरणात एकाचाच हात असावा, असा संशय स्‍थानिक आमदार क्रूझ सिल्‍वा यांनी व्‍यक्‍त केला.

धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न

पहाटे 3 वाजण्‍याच्‍या सुमारास हा प्रकार घडल्‍याचे सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यातून दिसून आले. गावात धार्मिक तणाव निर्माण करण्‍यासाठी कुणी हा प्रकार करतो का, अशी भीती स्‍थानिकांनी व्‍यक्‍त केली जात आहे. मंगळवारी तळपा खुरीस येथे मोडतोड झाल्‍याचे दिसून आले होते. त्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळावरील ठशांचे नमुने घेतले होते. आता आम्‍ही त्‍यांना सीसीटीव्‍ही (CCTV) फुटेजही दिलेले आहे. पोलिसांनी आता संबंधित संशयिताला अटक करुन त्‍याच्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी सिल्‍वा यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com