Goa News: सुभाष वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक; मंत्री सिक्वेरा म्हणाले सरकारही दखल घेणार

St. Francis Xavier DNA Test Controversy: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी देखील याप्रकरणी भाष्य करताना सरकार वेलिंगकरांच्या वक्तव्याची दखल घेऊन, कारवाई करेल असा विश्वास व्यक्त केला.
Goa News: सुभाष वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक; मंत्री सिक्वेरा म्हणाले सरकारही दखल घेणार
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

St. Francis Xavier DNA Test Controversy

बार्देश: सुभाष वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. ख्रिस्ती समाजातील नागरिकांनी हरमल पोलिस स्थानकावर धडक देत पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वेलिंगकरांच्या वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून, सरकार देखील याची दखल घेईल, असे आश्वासन मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिले आहे.

संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डिएनए चाचणी करावी, अशी मागणी केल्याने सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून ख्रिस्ती बांधव आणि राजकीय नेते सडकून टीका करत आहेत.

वेलिंगकरांवर कारवाईची मागणी देखील केली जात आहे. शुक्रवारी ख्रिस्ती नागरिकांनी हरमल येथील पोलिस स्थानकावर धडक देत पोलिसांना निवेदन दिले. सुभाष वेलिंगकर यांना अटक करा, अशी मागणी ख्रिस्ती नागरिकांनी केली आहे.

पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी देखील याप्रकरणी भाष्य करताना सरकार वेलिंगकरांच्या वक्तव्याची दखल घेऊन, कारवाई करेल असा विश्वास व्यक्त केला.

Goa News: सुभाष वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक; मंत्री सिक्वेरा म्हणाले सरकारही दखल घेणार
'हे देवा वेलिंगकरांना माफ कर, त्यांना माहिती नाही ते काय बोलले', मायकल लोबोंची Xavier चरणी प्रार्थना

फ्रान्सिस झेवियर यांची डीएनए चाचणी करण्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल सरकार सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करेल, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव आणि वॉरन आलेमाव यांनी वेलिंगकरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली आहे. वेलिंगकर सातत्याने ख्रिस्ती धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात अशी तक्रार, आलेमाव यांनी केलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com