सासष्टी, यंदाच्या होळीनिमित्त रेल्वे प्रशासनाने खास प्रवासी रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.
१) ट्रेन क्रमांक ०९४१२ व ०९४११ अहमदाबाद ते मडगाव व परत. ०९४१२ अहमदाबाद ते मडगाव रेल्वेसाठी खास प्रवासी दर असेल. ही गाडी १९ व २६ मार्च २०२४ असे दोन दिवस अहमदाबादहून सकाळी ९.३० वाजता सुटेल व मडगावात दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९४११ ही २० व २७ मार्च रोजी मडगावहून सकाळी ८ वाजता सुटेल व अहमदाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. या गाडीला २२ डबे असतील व गोव्यात थिवी व करमळी स्थानकांवर थांबेल.
२) ट्रेन क्रमांक ०९०५७ व ०९०५८ उधाना ते मंगळुरू- ट्रेन क्रमांक ०९०५७ ही उधानाहून २० व २४ मार्च असे दोन दिवस रात्री ८ वाजता सुटेल व मंगळुरू स्थानकावर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०९०५८ ही ट्रेन २१ व २५ मार्च असे दोन दिवस मंगळुरूहून रात्री १० वाजता सुटेल व उधाना स्थानकावर दुसऱ्या दिवशी रात्री ९.०५ वाजता पोहोचेल. गोव्यात ही गाडी थिवी, करमळी, मडगाव, काणकोण या स्थानकांवर थांबेल.
३) ट्रेन क्रमांक ०९१९३ व ०९१९४ सुरत ते करमळी व परत. ०९१९३ ही ट्रेन २१ व २८ मार्च असे दोन दिवस सुरतहून रात्री ७.५० वाजता सुटेल व करमळी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.