Margao News: मडगावातील 'कोमुनिदाद इमारतीचे' नूतनीकरण करा! दक्षिण गोवा सदस्यांची मागणी

Margao Comunidade Buildng: दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक मंगलदास गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा कोमुनिदाद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
Margao Comunidade Buildng: दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक मंगलदास गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा कोमुनिदाद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
ComunidadeDG
Published on
Updated on

Margao Comunidade Building Renovation

सासष्टी: दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक मंगलदास गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा कोमुनिदाद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मडगावातील कोमुनिदाद इमारतीचे नूतनीकरण करण्याची मागणी सदस्यांनी केली तसेच डिजिटलायझेशनद्वारे जुने दस्ताऐवज जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दर महिन्याला कोमुनिदादचे (Comunidade) सदस्य बैठक घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करणार आहेत, असेही ठरविण्यात आले. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या मोजक्या ॲटर्नीनी समस्या मांडल्या. यामध्ये कोमुनिदाद इमारतींची दुरुस्ती, कोमुनिदाद मालकीच्या जमिनीवर होत असलेले अतिक्रमण अशा विषयांचा समावेश होता. सध्या कोमुनिदाद प्रशासन कचेरीला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यावर सुद्धा विचार विनिमय झाला.

Margao Comunidade Buildng: दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक मंगलदास गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा कोमुनिदाद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
Margao News: पुढे काय? मडगावात भटक्‍या कुत्र्यांची समस्‍या नियंत्रणासाठी प्राणी संस्‍थेशी करार पण..

मडगाव कोमुनिदाद वास्तूच्या नूतनीकरणास सदस्य संमती देण्यास तयार आहेत. हे काम साबांखामार्फत होणार आहे. इमारतीचा मालकी हक्क कोमुनिदादकडेच रहावा, असा सदस्यांचा हट्ट आहे. त्यामुळे बांधकाम खात्याने नेमका काय निर्णय घेतला, हे स्पष्ट नसल्याचे कळते. या बैठकीमुळे अनेक समस्यांवर प्रकाश पडला,असे ॲटर्नी सेलेस्टीन नॉरॉन्हा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com