Solar Ferry Boat: प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी सोलर फेरीबोट सेवा खंडित - सुभाष फळदेसाई

आश्वासन देऊनही कंपनीचे दुर्लक्ष
Goa | Solar Ferry Boat
Goa | Solar Ferry BoatDainik Gomantak

जुने गोवे ते पणजी फेरी धक्का अशी सौरऊर्जा फेरीबोट सेवा मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आली खरी. मात्र, सध्या ही प्रवासी बोटसेवा प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी बंद आहे. त्यामुळे ही सौरऊर्जा बोट पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी खात्यातर्फे पर्यटनासाठी देण्यासाठी निविदा मागवण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

सध्या सुरू असलेल्या फेरीबोट सेवेच्या बदल्यात ही सौरऊर्जेवरील फेरीबोट सेवा सुरू करण्यात आलेली नाही. सरकारने ही सौरऊर्जा फेरीबोट प्रवाशांसाठीच खरेदी केली होती.

सौरऊर्जा फेरीबोटीची बांधणी केलेल्या कंपनीला नदी परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सांगितले होते. मात्र, या कंपनीने आश्‍वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले. या सौरऊर्जा बोटीमधून सरकारला महसूल मिळावा, यासाठी ती सुरू करण्याच्या दृष्टीने निविदा मागण्यासाठीच्या परवानगीसाठी फाईल संबंधित खात्याकडे पाठवली आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

घाईगडबडीत उद््घाटन-

कोट्यवधी रुपये खर्चून सरकारने ही सौरऊर्जा हायब्रीड बोट खरेदी केली. ही बोट बांधून तयार झाली तरी त्यासाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसतानाही घाईगडबडीने तिचे उद्‍घाटन करण्यात आले.

जुने गोवे ते पणजी फेरी धक्का या प्रवासासाठी शुल्कही ठरवले होते. मात्र, प्रत्यक्षात ही बोट सध्या मांडवी नदीत उभी आहे. आता तिचा कशाप्रकारे वापर करता येईल, याचा विचार नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई करत आहेत.

Goa | Solar Ferry Boat
Goa Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या

या फेरीबोटीचा प्रस्ताव व प्रक्रिया माझ्या कार्यकाळात झालेली नव्हती. त्याबाबत निर्णय घेताना मी नव्हतो. बोटीची बांधणी कऱण्यासाठी वेळ लागतो. कुशल मनुष्यबळ नसताना ती सुरू करण्याबाबत मी सहमत नव्हतो. या बोटीवर काम करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असून ते नसतानाच घाईगडबडीने या बोटीचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

- सुभाष फळदेसाई, नदी परिवहन मंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com