गोमंतकीयांच्या सेवेसाठी सौर ऊर्जा बोट

4.2 कोटींचा खर्च : पणजी-चोडण जलमार्गावर ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता
Solar Ferry Service in Goa
Solar Ferry Service in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्‍यात हरित क्रांती, नैसर्गिक संसाधानांचा वापर करून होणारा कार्बन प्रदूषण कमी करण्यासाठी, तसेच जीवाश्‍म इंधानाचा पर्याय म्हणून अत्याधुनिक सौर ऊर्जा इलेक्ट्रिक बोट सेवा सुरू होणार आहे.

गोवा सरकारचा पुढाकारातून बोट सेवा सुरू करण्यात येत असून, बंदर कप्तान खात्याच्या मार्गदर्शनाखाली नदी परिवाहन खात्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पणजी-चोडण या जलमार्गावर ही बोट चालणार आहे. बोटीच्या बांधकामासाठी सुमारे 4.2 कोटी रुपये खर्च आला आहे. तर, येत्या ऑगस्टमध्ये ही बोट सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बंदर कप्तान खात्याने दिली आहे. (Solar Ferry Service in Goa)

फास्ट चार्जिंगची सुविधा, प्रवाशांच्या सुरक्षेची हमी

बोटमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत. प्रत्येक मोटरची क्षमता 130 किलो वॅट असून बॅटरीद्वारे 40 किलो वॅट प्रति तास उर्जा मिळणार आहे. तर सौर ऊर्जेतून 20 किलो वॅट इंजिनला ऊर्जा जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत इलेक्ट्रिक जनरेटर काम करणार असून, इंजिन बंद पडल्यास प्रवाशांना सुरक्षितरीत्या पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बोटीची क्षमता 60 प्रवासी असून दोन तास प्रवास केल्यास धक्क्यावर येऊन चार्ज करावी लागणार आहे. त्यात लवकर चार्च करण्यासाठी फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.

Solar Ferry Service in Goa
चालढकल महागात पडली; गोव्याची संधी अखेर हुकलीच

हरित क्रांती, स्वस्त वाहतुकीच्या सोयीसाठी ही अत्याधुनिक सौर ऊर्जा इलेक्ट्रिक बोट सेवा आहे. यासाठी राज्‍यातील सर्व तंरगणाऱ्या धक्क्यांवर बॅटरी चार्ज करण्याची सुविधा तयार केली जाणार आहे. पणजी ते चोडण जलमार्गावर ही बोट चालणार आहे. पणजीतील तरंगणाऱ्या धक्क्यावर ती थांबेल. याच प्रकारची सोय चोडण येथे देखील केली जाईल, अशी माहिती सागरी अभियंता ऑक्टाव्हियो रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com