World Soil Day 2022: रासायनिक द्रव्यांमुळे बिघडली जमिनीची सुपीकता; सेंद्रिय खतांचा वापर आवश्‍यक

World Soil Day 2022: जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी सुपीकता समजून घेणे महत्त्वाचे आहे.
World Soil Day
World Soil Day Dainik Gomantak

World Soil Day 2022: रासायनिक खते, तणनाशके व कीटकनाशके यांच्या बेसुमार वापरामुळे दिवसेंदिवस शेत जमिनीचे आरोग्य व सुपीकता बिघडत आहे.  हे रोखण्यासाठी जमिनीत नैसर्गिक घटकांचा, सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे, असे मत जुने गोवे येथील आयसीएआरच्या कृषी विज्ञान केंद्राचे मृदा विभागाचे अधिकारी राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शेत जमिनीची सुपीकता आणि संवर्धन यासाठी जनजागृती व्हावी, या उद्देशाने डिसेंबर 2013 मध्ये युनायटेड नेशनच्या 68व्या आमसभेत 5 डिसेंबर हा मृदा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. प्रत्येक वर्षी मृदा दिवसाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. यंदा जमिनीचे क्षारपण थांबवा आणि सुपीकता वाढवा ही संकल्पना आहे.

World Soil Day
Goa Corona Update: मोठा दिलासा! आठ महिन्यानंतर गोव्यात शून्य कोरोना रूग्णांची नोंद

पाण्याच्या जास्त वापरामुळे सुद्धा जमिनीत क्षारतेचे प्रमाण वाढते आणि जमिनी मिठासारख्या पांढऱ्या दिसतात. जमिनीत हानिकारक क्षारांचे प्रमाण वाढल्यामुळे पिकांच्या वाढीकरता आवश्यक असलेले अन्नद्रव्य जसे की नत्र, स्फुरण, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये ज्यात लोह, मॅगनीज, झिंक कॉपर, बोरिंग आदी कमी होतात. परिणामी पिकांच्या भरघोस वाढ होत नाही. जमिनीची सुपीकता बिघडते.

सॉइल हेल्थ कार्डचे वाटप

जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी सुपीकता समजून घेणे महत्त्वाचे आहे. याकरिता माती परीक्षणाचे सॉईल हेल्थ कार्ड महत्त्वाची असते. ज्या आधारे खतांची मात्रा देता येते. आईसीएआर कृषी विज्ञान केंद्राकडून राज्यातल्या 200 हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीचे सॉइल हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.

...यामुळे होईल शेतकऱ्यांचा फायदा

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा समतोल व आरोग्य बिघडते. त्याला पर्याय म्हणून एकात्मिक खतांचा वापर करणे योग्य ठरेल. यामध्ये रासायनिक आणि नैसर्गिक खतांचा वापर केला जातो. सध्या गांडूळ खत, शेणखत, पोल्ट्री खत, मत्स्य खत, पिग मॅन्युअर इत्यादी नैसर्गिक खते उपलब्ध आहेत, त्यांचा वापर अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी केल्यास त्याचा उपयोग जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी नक्कीच होईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यातील जमिनी लोहयुक्त: राज्यातील जमिनी अति पावसामुळे लोहयुक्त बनल्या आहेत. त्यात नत्र, झिंक, बोरॉन कमी आहे. जमिनीचा सामू (पीएच) 4.55 ते 5.5 दरम्यान आहे. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी आहे. अशा जमिनीत हानिकारक क्षारांचे प्रमाण वाढलेले दिसते. जमिनीचे आरोग्य सुधारावे याकरिता माती परीक्षण करून सॉईल हेल्थ कार्ड बनवून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com