Goa Fraud: 5 व्हॉट्सअप नंबरवरून संपर्क साधला, 2.45 कोटींची केली फसवणूक; पश्‍चिम बंगालच्या महिलेचा फेटाळला जामीन

Goa Crime: गोवा पोलिस क्राईम ब्रँचने अर्जदार दत्ता हिला बीएनएसएसच्या कलम ३५(३) खाली नोटीस दिली त्याचे पालन केले नाही. त्यामुळे ती गुन्ह्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहली नाही.
Court Order
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले व गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याच्या बहाण्याने २.५ कोटींना गंडा घातलेल्या पश्‍चिम बंगालच्या बैशाली दत्ता हिचा अटकपूर्व जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.

गोवा पोलिस क्राईम ब्रँचने अर्जदार दत्ता हिला बीएनएसएसच्या कलम ३५(३) खाली नोटीस दिली त्याचे पालन केले नाही. त्यामुळे ती गुन्ह्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहली नाही. तक्रारदार रुद्रेश अविनाश साखरदांडे हा संशयित दत्ता हिला ओळखत नव्हता. त्यामुळे खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही.

अर्जदाराव्यतिरिक्त या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी संशयित आहेत त्यांचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही. तिची कोठडीतीली चौकशी महत्त्वाची आहे. कारण संशयितांनी तक्रारदाराला जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रक्कमेची फसवणूक केली आहे.

Court Order
Goa Investment Scam: जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 2.90 कोटींचा गंडा, बायो इस्टेट सोल्सुशन्स कंपनीविरुद्ध गुन्हा

इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या कोणत्याही गंभीर गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर करता येत नाही. कारण तक्रारदाराला कायदेशीररित्या पैसे परत मिळण्यास वंचित ठेवण्यात आले आहे ज्याचा तो योग्य हक्क आहे, असे निरीक्षण न्यायालयाने बैशाली दत्ता हिचा अटकपूर्व जामीन फेटाळताना नोंदविले आहे.

Court Order
Samagra Shiksha Abhiyan Fraud: 4.6 कोटींचा अपहार: 'समग्र शिक्षा अभियाना'तील शिक्षणाचा पैसा भ्रष्टाचाराच्या गर्तेत!

फेसबुकद्वारे साधला संपर्क

२५ नोव्हेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ या काळात पाच व्हॉट्सअपचा वापर करून फसवणूक करण्याच्या हेतून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म फेसबुकच्या आधारे तक्रारदाराशी संपर्क साधला व त्याला मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले. तक्रारदाराने वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकूण २,४४,५९,४०८ रुपये जमा केले. त्यानंतर संशयितांनी संगणक स्रोताचा वापर करून फसवणूक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com