Goa News: आक्षेपार्ह पोस्‍ट; मुस्लिमबांधव संतप्त, मडगावसह विविध पोलिस स्थानकांसमोर ठिय्या

वाळपई-मासोर्डेतील संशयित युवकाला अटक
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mob Protests In Goa: ‘कॅच मी इफ यू कॅन’ या नावाच्‍या इन्‍स्‍टाग्राम अकाऊन्‍टवरून प्रेषित महंमद पैगंबराबाबत आक्षेपार्ह पोस्‍ट टाकली गेल्‍याने मडगावात आज तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ही पोस्‍ट टाकणाऱ्याला त्‍वरित अटक करा, अशी मागणी करत आज सकाळी हजारोंच्‍या संख्‍येने मुस्‍लिम बांधवांनी मडगाव पोलिस स्‍थानकावर चाल करून येऊन पोलिस स्‍थानक आवारात ठिय्‍या मारला.

जमाव नियंत्रणात आणण्‍यासाठी मडगाव पोलिसांवर तब्‍बल पाच तास त्‍यांची मनधरणी करण्‍याची वेळ आली.

या प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्‍हा नोंद केला आहे आणि हा आक्षेपार्ह पोस्‍ट टाकणाऱ्याचा ठावठिकाणा शोधण्‍यासाठी सायबर पोलिस विभागाला कामाला लावले आहे, असे आश्‍वासन मडगावचे उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिले.

त्यानंतर दुपारी हा जमाव पोलिस स्‍थानकावरून उठला. त्‍यापूर्वी या जमावाने जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यत आम्‍ही उठणार नाही असा पवित्रा घेऊन पोलीस स्‍थानकातच ठाण मांडत संपूर्ण पोलीस यंत्रणाच त्‍यांनी वेठीला धरली.

उर्फान मुल्‍ला, इफ्‍तीयाज शेख अादी मुस्‍लिम नेत्‍यांनी या जमावाची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांनी खवळून या नेत्‍यांनाच विरोध केला.

Goa News
Goa Monsoon 2023: राज्यावर घोंघावतेय उग्र वादळाचे संकट; रेड अलर्ट जारी

‘त्या’ व्हिडिओवर आक्षेपार्ह पोस्ट

आंदाेलकांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे, या इन्‍स्‍टाग्राम अकाऊन्‍टवरून फक्‍त मुस्‍लिम देवतांचीच नव्‍हे तर ख्रिस्‍ती देवतांचाही अवमान करणारी भाषा वापरली गेली आहे. परवा गुरूवारी ईदचा जुलूस निघाल्‍यानंतर या जुलूस मिरवणुकीचा एक व्‍हिडिओ समाज माध्‍यमावर टाकण्‍यात आला होता.

याच व्‍हिडिओवर प्रतिक्रिया टाकताना ही आक्षेपार्ह पोस्‍ट टाकली होती. ही पोस्‍ट व्‍हायरल झाल्‍यानंतर त्‍या रात्रीच मडगाव पोलिस स्‍थानकावर काही मुस्‍लिम नेत्‍यांनी तक्रार दिली होती. ही तक्रार देऊन २४ तास उलटले तरीही संशयिताला अटक झाली नाही या कारणास्‍तव हा जमाव पोलीस स्‍थानकावर चाल करून आला हाेता.

वाळपई-मासोर्डेतील युवकाला अटक

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी संतापलेल्या मुस्लिम बांधवांनी वाळपई पोलिस स्थानकात सायंकाळी ४ च्या सुमारास गर्दी केली होती. आक्षेपार्ह प्रतिक्रिया नोंदवल्याप्रकरणी मुस्लिम समाजातर्फे मासोर्डे येथील किशन नाईक या युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

प्रतिक्रियेमुळे मुस्लिमांची धार्मिक भावना दुखावली आहे, त्यामुळे त्याला तातडीने अटक करा,अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली. यावेळी पोलिस स्थानकात सुमारे 200 जणांचा जमाव होता. त्यामुळे वातावरण तंग झाले होते.

तपासाबाबत रोज कळवू !

या प्रकरणाचा तपास करताना काही तांत्रिक बाबी पार पाडाव्‍या लागतात आणि ही प्रक्रिया वेळ काढणारी आहे. असे जरी असले तरी पोलिस दरराेज या प्रकरणात काय तपास करतात, त्याबाबत तुमच्‍या नेत्‍यांना आम्‍ही रोज कळवू, असे पोलिसांनी आश्‍वासन दिल्‍यानंतर हा जमाव शांत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com