Shripad Naik And Viriato Fernandes: श्रीपाद यांची संस्कृत, विरियातोंची कोकणीतून सदस्यत्वाची शपथ

Parliament Session 2024: गोव्यात दोन्ही जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. उत्तर गोव्यातून भाजपच्या श्रीपाद नाईक यांच्या विरोधात काँग्रेस तथा इंडिया आघाडीच्या रमाकांत खलप यांचे आव्हान होते.
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

लोकसभा निकालानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांनी सदस्यपदाची शपथ घेतली. गोव्याच्या दोन्ही खासदारांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतली. श्रीपाद नाईक यांनी संस्कृतमधून तर विरियातो फर्नांडिस यांनी कोकणीतून सदस्यपदाची शपथ घेतली.

गोव्यात दोन्ही जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. उत्तर गोव्यातून भाजपच्या श्रीपाद नाईक यांच्या विरोधात काँग्रेस तथा इंडिया आघाडीच्या रमाकांत खलप यांचे आव्हान होते. तर, भाजपने महिला उमेदवार पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देऊन प्रतिष्ठेच्या केलेल्या दक्षिण गोव्यात काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस उभे होते.

दोन्ही जागेवर त्यांचे उमेदवार विजयी होतील, असा दावा करणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या हाती निराशा आली. उत्तरेत श्रीपाद नाईक एक लाखांहून अधिक तर दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस जवळपास चौदा हजार मतांनी विजयी झाले आहेत.

लोकसभेच्या निकालानंतर पहिल्याच अधिवेशनासाठी दिल्लीत गेलेल्या गोव्यातील दोन्ही खासदारांनी आज सदस्यपदाची शपथ घेतली.

Panaji
Goa Congress: 'अजूनही वेळ गेलेली नाही', विधवांवरील अत्याचार थांबवण्यासाठी विधेयक आणा - बीना नाईक

त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. नंतर मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.

विकसित भारत २०४७ च्या अंतर्गत गोवा विकसित करण्यासाठी मोदींकडून मार्गदर्शन आणि सल्ला घेतला, असे सावंत यांनी ट्विट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com