गोव्यातील पर्यटकांना आकर्षित करते श्री महालसा नारायणी मंदिर

श्री महालसाची मूर्ती गोव्यात (Goa) मातीच्या भांड्यात आणली आणि नंतर मंदिरात (Temple) स्थापित केली गेली होती.
श्री महालसाची नारायणीची  मूर्ती
श्री महालसाची नारायणीची मूर्ती Dainik Gomantak
Published on
Updated on

महालसाची मंदिराची (Mahalasa Narayani Temple) स्थापणा कुम्ताच्या पई कुटुंबाने दान केलेल्या जमिनीवर 1565 साली केले गेले. या मंदिराचे निर्माण गुरव या नावातंर्गत अरचाकांद्वारे केले गेले होते. अर्थात याच व्यक्तीने श्री महालसाची कास्य मूर्ती गोव्यामध्ये (Goa) आणली. श्री महालसाची मूर्ती गोव्यात (Goa) मातीच्या भांड्यात आणली आणि नंतर मंदिरात (Temple) स्थापित केली गेली होती.

श्री महालसा नारायणी मंदिरामध्ये लक्ष्मीनारायण, ग्रामपरूष, शांतेरी, दादशंकर, भगवती आणि काळ भैरव या इतर देवतांचीही पूजा केली जाते. येथील मंटपाच्या छतावर अनोखी कलात्मक लाकडी कोरीवकाम केलेली आहे. येथे चुना आणि तोफपासून बनवलेली सुंदर लाल आणि पांढरी भिंत अशी अनेक चित्रे आहेत.

Facebook/@MahalasaTemple Temple

येथील भिंतीवर रामयण आणि महाभारताच्या विविध क्षणाचे प्रतिनिधित्व करणारे चिते आहेत. महालसा मंदिरामध्ये अनेक उत्सव आनंदात साजरे केल जाते. श्रावण महिना, पौर्णिमा, दशमी आणि वद्यपद्य यासरखे अनेक सण साजरे केले जातात. या मंदिराचा वर्धापन दिवस मार्च ते एप्रिल या महिन्यात साजरा केला जातो. तसेच पर्यटकांना कुम्ता दौरा करतांना महालसा मंदिरात भेट देण्याचा सल्ला देण्यात येतो.

श्री महालसाची नारायणीची  मूर्ती
कष्टकरी भूमिपुत्रांसाठी गोवा राज्य नवनिर्माण आघाडी

महालसची ओळख मोहिनी या भगवान विष्णूच्या स्त्रीलिंगी अवताराशी केली आहे. महालसाचे चार हात आहेत यातील एका हातात त्रिशूल, एका हातात तलवार, छेडलेले डोके आणि पिण्याचे भांडे आहे. तिने यज्ञोपवीत सुद्धा परिधान केले आहे. जे सहसा देवता परिधान करतात. गौड़ सारस्वत ब्राह्मण आणि गोवा आणि दक्षिण किनारा येथील वैष्णव तिला मोहिनी म्हणून ओळखतात. भविष्य पुराणामध्ये माहिती दिलल्याप्रमाणे तिला नारायणी आणि राहू-मंथनी 'राहुचा नाश करणारी' या नावाने ओळखली जाते. या मंदिरात, महालसा देवी मोहिनी आणि भगवान विष्णु यांच्याशी संबंधित आहे. खंडोबा संप्रदायामध्ये या देवीला पार्वती देवी आणि खंडोबा म्हणून ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com