Panaji News : ‘आयॲड्‌स अँड ईव्हेंट्‌स’तर्फे ताळगावात शॉपिंग फेस्टिव्हल

Panaji News : आंतरराष्ट्रीय पॅव्हिलियनमध्ये थायलंडसह तुर्की, कोरिया, अफगाणिस्तान, तैवान, मलेशिया आणि यूएई येथील स्टॉल्स आहेत. येथील विविध दर्जेदार वस्तूंवर डिस्काऊंट व ऑफर्स देण्यात येत आहेत, अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, आयॲड्‌स अँड ईव्हेंट्‌स यांच्यातर्फे ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये होम फर्निचर एक्स्पो आणि थायलंड शॉपिंग फेस्टिव्हलला शुक्रवार, १५ रोजीपासून सुरवात झाली. हे फेस्टिव्हल सोमवार, १८ रोजीपर्यंत चालणार आहे.

याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

आंतरराष्ट्रीय पॅव्हिलियनमध्ये थायलंडसह तुर्की, कोरिया, अफगाणिस्तान, तैवान, मलेशिया आणि यूएई येथील स्टॉल्स आहेत. येथील विविध दर्जेदार वस्तूंवर डिस्काऊंट व ऑफर्स देण्यात येत आहेत, अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

इंटिरियर अँड एक्स्टिरियर या प्रदर्शनात कल्पक कारागिरी असलेले फर्निचर विक्रीसाठी मांडण्यात आले आहेत.

Panaji
Goa Loksabha Election 2024 Dates: गोव्यात कधी होणार लोकसभेसाठी मतदान? जाणून घ्या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक

या ठिकाणी खास थायलंड फर्निचर उपवब्ध आहे. तसेच अन्य वस्तूंमध्ये महिलांचे साहित्य, लाकडी किचन ॲसेसरीज, थाई बाम, थाई स्पा उत्पादने, तुर्की लाईट्‌स, अफगाणिस्तानी ड्राय फ्रूट्‌स, पर्ल ज्वेलरी यांचा समावेश आहे.

या एक्स्पोमध्ये विविधांगी फर्निचर, अंतर्गत सजावटीच्या वस्तू, ऑफिस फर्निचर, मॉड्युलर फर्निचर, सोफा सेटचे मॉडेल्स, पेंटिंग, मॅट्रेस, बंक बेड्‌स, पाण्याचे कारंजे, म्युरल्स अशा वस्तू उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com